आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिमुरडीचा खून करून पित्याचीही आत्महत्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परभणी- दैठणा (ता. परभणी) येथील पित्याने पत्नीवरच्या रागातून आपल्या सहावर्षीय चिमुकलीची गळा दाबून खून करत काही वेळातच स्वत:ही शेतात जाऊन गळफास घेतल्याचा प्रकार शनिवारी (दि. २०) पहाटेच्या सुमारास घडला. याप्रकरणी दैठणा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दैठणा येथील सोपान ज्ञानोबा गायकवाड (३५) याची पत्नी छाया ही शुक्रवारी (दि. १९) दुपारी त्याला न विचारता निघून गेली होती. पत्नीच्या अचानक बाहेर जाण्याने तो विमनस्क स्थितीत होता. पत्नीवरचा राग मनामध्ये धरून त्याने शनिवारी पहाटे चारच्या सुमारास स्वत:ची सहावर्षीय मुलगी सुशीला हिचा गळा आवळून खून केला. त्यानंतर काही वेळातच तो गावाजवळच असलेल्या स्वत:च्या शेतात गेला. तेथे त्याने लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. मुलीचा खून करून वडिलानेही आत्महत्या केल्याचा प्रकार सकाळीच गावात उघडकीस आल्याने हळहळ व्यक्त होत होती. या प्रकाराबाबत तर्कवितर्क लढवले जात होते. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
बातम्या आणखी आहेत...