आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उस्मानाबाद: खासगी वसतिगृहात कर्मचाऱ्याकडून मुलांचे लैंगिक शोषण!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद- शहरातील विद्यार्थ्यांच्या एका खासगी निवासी वसतिगृहात कर्मचाऱ्याकडून विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषण झाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर सोमवारी (दि.१७) सदरील विद्यार्थ्यांचे पालक तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्यापर्यंत गेले, परंतु अचानक तक्रार मागे घेण्यात आल्याने कोणावरही गुन्हा दाखल झालेला नसला तरी शहरात मात्र या प्रकारामुळे संताप व्यक्त होत होता.   

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, उस्मानाबाद शहरातील शैक्षणिक संकुल म्हणून ओळख असलेल्या परिसरातील मुलांच्या वसतिगृहात तेथे राहणाऱ्या विद्यार्थ्यांना वसतिगृहातील कर्मचाऱ्याने लक्ष्य केले. त्यांच्याशी अनैसर्गिक कृत्य करून त्यांचे लैंगिक शोषण केल्याचे प्रकरण समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. घडला प्रकार सदरील विद्यार्थ्यांनी पालकांना सांगितल्यानंतर पालकांनी याप्रकरणी दाद मागण्यासाठी प्रथम पोलिस ठाणे गाठले. तेथे ठाण्याच्या आवारातच बराच खल झाल्यानंतर अचानक तक्रार न देता सर्वजण माघारी फिरले. हा प्रकार दोन विद्यार्थ्यांसोबत घडल्याची माहिती आहे.