आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलाच्या आत्महत्येचे दु:ख, पित्याचीही आत्महत्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परभणी- तीन वर्षांपासून सतत आजारी असल्यामुळे वैफल्यातून राज्य राखीव पोलिस दलाच्या एका जवानाने मंगळवारी सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. मुलाच्या आत्महत्येचे दु:ख दुःख सहन न झाल्याने  गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. शहराच्या वांगी रोडवरील सरगम कॉलनी परिसरात ही घटना घडली.    
 
चंद्रकांत मरिबा गायकवाड (४२) जालना येथे राज्य राखीव दलाच्या तुकडीत कार्यरत होते. तीन वर्षांपासून ते नेहमी आजारी पडत असल्याने घरीच होते. अनेक रुग्णालयांत उपचार करूनही प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने चंद्रकांत यांना नैराश्य आले होते. त्यातूनच त्यांनी मंगळवारी घराच्या पत्र्यास असलेल्या लोखंडी रॉडला दोरी बांधून गळफास घेतला.
 
चंद्रकांत यांचे वडील तेथून जवळच असलेल्या कृषी नगरात वास्तव्यास होते. ते सेवानिवृत्त कर्मचारी असून त्यांना मुलाने आत्महत्या केल्याचे समजताच ते चंद्रकांतच्या घरी आले. मुलाच्या मृत्युने हादरलेले चंद्रकांत गायकवाड पुन्हा कृषी नगरात गेले. त्यांनीही साडेसातच्या सुमारास छताच्या लोखंडी हुकाला गळफास घेतला. पिता-पुत्रांनी एका दिवशी आत्महत्या केल्याने शहरात खळबळ उडली. नानलपेठ पोलिसांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत दोघांचेही मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी  रुग्णालयात पाठवला.
बातम्या आणखी आहेत...