आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुणीही शेतात या अन‌् मिरची फुकट तोडून न्या;अजिंठ्यातील शेतकऱ्याचे आवाहन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अजिंठा- महिनाभरापूर्वी अकरा हजार रुपये भाव असलेल्या मिरचीच्या भावात मोठी घसरण झाली असून काही दिवसांपूर्वी आठ ते दहा रुपये किलो ने हिरवी मिरची विक्री सुरू होती. आता थेट तीन रुपयांवर घसरली आहे.

बाजारात विक्री करता संतोष ठाकरे, मंगेश झलवार आदींनी मिरची रस्त्यावर फेकून दिली. शेतकरी कैलास झलवार यांनी आवाहन केले आहे की, कुणीही माझ्या शेतात या मिरची तोडून फुकट न्या.

खर्चही परवडेना : मिरचीसाठीतोडणी खर्च रुपये, वाहतूक प्रतिपोते रुपये, बाजारात विक्रीसाठी भाडे १० रुपये असा एकूण पोत्यामागे २० रुपयांचा खर्च होत असून भाव मात्र तीन रुपये किलोपर्यंत घसरले आहेत.

एकरी खर्च ६८ हजार, उत्पन्न १३ हजार रुपये
मल्चिंग पेपर : २० हजार
मजुरी: 3 हजार
राेपे लागवड : १५ हजार
फवारणी खर्च : १५ हजार
ड्रीपद्वारे अाैषध : १० हजार
खत: २० हजार
एकूण खर्च : ६८ हजार
एकरात ४० क्विंटल मिरची यातून हातात येणारे उत्पन्न
४०क्विं.x३२०रु.=१३००० रु.
बातम्या आणखी आहेत...