आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लातूरच्या रस्त्यांवर लवकरच धावणार 23 सिटी बसेस, मनपाच्या परिवहन समितीने घेतला निर्णय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर- लातूरकरांच्या सेवेत दाखल झालेल्या तीन सिटी बसेस बंद झाल्या असल्या तरी आता लवकरच मनपाच्या त्या तीन बसेससह खासगी एजन्सीच्या २० अशा एकूण २३ सिटी बसेस शहरातील रस्त्यांवर धावताना दिसणार आहेत. 
 
काही महिन्यांपूर्वी रॉयल्टी तत्त्वावर सिटीबस चालवण्यास देण्याचा निर्णय मनपाच्या परिवहन समितीने घेतला होता.आता निविदा मंजूर करून मनपाच्या तीन व कंत्राटदाराच्या वीस सिटी बसेस चालवण्याची परवानगी परिवहन समितीचे सभापती पंडित कावळे यांनी दिली आहे. लातूर शहराला केंद्र शासनाच्या जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनरुत्थान योजनेंतर्गत सिटी बस सेवा मंजूर करण्यात आली होती, मात्र या योजनेचे अनुदान मनपाला मिळाले नाही. त्यामुळे मनपाला सिटी बस सेवा देताना आर्थिक तोटा सहन करावा लागत होता.  

त्यामुळे २९ ऑक्टोबर २०१६ रोजी परिवहन समितीच्या बैठकीत पूर्वीच्या एजन्सीचे काम बंद करण्याचा निर्णय घेतला व सिटी बस सेवा रॉयल्टी तत्त्वावर चालविण्यास देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर रॉयल्टी बेसवरच्या निविदा मागविण्यात आल्या, परंतु दोन वेळा दोनच ई-निविदा आल्याने तिसऱ्यांदा निविदा मागवावी लागली. अखेर तीन ई-निविदा प्राप्त झाल्या. त्यामध्ये सर्वात कमी दर असलेल्या श्रीवरी बिझनेस सर्व्हिसेस प्रा. लि. या कंत्राटदारास पत्र देऊन बोलावून दराबाबत वाटाघाटी करण्यात आल्या आहेत.. त्यानुसार मनपा मालकीच्या तीन बसेसचे दर २.२५ रुपये प्रतिकिमी व कंत्राटदाराच्या २० मिनी बसेसचे दर १.८५ रुपये प्रतिकिमी असे ठरवण्यात आले आहे.  
बातम्या आणखी आहेत...