आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणंदमुक्तीत गेवराई बीडमध्ये प्रथम, तर मराठवाड्यात तृतीय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेवराई - स्वच्छ महाराष्ट्र अभियानात गेवराई शहरातील पाच वाॅर्ड पाणंदमुक्त झाले असून १ हजार ७४० नागरिकांनी शौचालयाचे बांधकाम पूर्ण केले आहे.  दरम्यान, शनिवारी (१८ फेब्रुवारी) नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत शहर पाणंदमुक्त झाल्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे गेवराई पालिका बीड जिल्ह्यात पहिली व मराठवाड्यात तिसरी ठरली आहे.   

गेवराई शहरात  दीड वर्षापूर्वी उघड्यावर शौचास जाणाऱ्यांची संख्या जास्त होती. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडले होते. आ. लक्ष्मण पवार यांनी नगरसेवकांची एक बैठक घेत  आठ वाॅर्डांत सर्व्हे करण्यात आला होता.  शौचालय उभारण्यासाठी ६ हजार रुपयांचा पहिला हप्ता देण्यात आला होता. शौचालयाचे  बांधकाम पूर्ण करणाऱ्या नागरिकांना ८ हजार दुसरा हप्ता देण्यात आला होता. सुरुवातीला याबाबत नागरिकांना विश्वास वाटला नाही. मात्र नंतरच्या काळात  नागरिकांचा पालिकेवरील विश्वास वाढत गेला. सामान्य नागरिकांनी प्रतिसाद दिल्याने शहरातील  आठपैकी पाच वाॅर्डांत शौचालयाची कामे पूर्ण झाली. 
 
२०११ च्या जनगणनेप्रमाणे  शहरातील २ हजार १६० घरांत शौचालय नसल्याने  १३ हजार नागरिक उघड्यावर शौचास जात होते . २०१५ मध्ये स्वच्छ महाराष्ट्र अभियानात शहरातील १ हजार ७४० नागरिकांनी शौचालयाचे बांधकाम पूर्ण  केले असून  सध्या २८६ नागरिकांच्या शौचालयाचे  बांधकाम प्रगतिपथावर आहे. ज्या नागरिकांकडे शौचालय नाही अशांसाठी शहरातील विविध भागांत ८ सार्वजनिक शौचालयांची व्यवस्था करण्यात आली आहे.
 
या ठिकाणी पाणी, वीज, स्वच्छतेसाठी दोन शौचालयांसाठी एक कर्मचारी  नियुक्त करण्यात आला आहे. गेवराईतील  बचत गट, शाळा-महाविद्यालयांनीही शहर  पाणंदमुक्त मुक्त झाल्याचे  घोषणापत्र नगर परिषदेकडे जमा केलेे. यासाठी  नगराध्यक्ष सुशील जवंजाळ, मुख्याधिकारी भागवत बिघोत,  उपनगराध्यक्ष राजेंद्र राक्षसभुवनकर , सर्व नगरसेवक सदस्य, कर्मचाऱ्यांनी मुख्याधिकारी यांच्या नियंत्रणाखाली  गुड मॉर्निंग व गुड इव्हिनिंग  पथकांच्या माध्यमातून जनजागृती सुरू आहे.  

तीन पालिका पाणंदमुक्त   
स्वच्छ महाराष्ट्र अभियानात पालिकेबरोबरच नागरिकांनी सहभाग  वाढवल्याने गेवराई पालिका बीड जिल्ह्यात पहिली पाणंदमुक्त पालिका ठरली असून मराठवाड्यात पाथरी, उमरी  तर बीड जिल्ह्यात गेवराई पालिका तिसरी ठरली आहे.
 
टोल फ्रीवर संपर्क साधा   
नागरिकांनी वैयक्तिक शौचालयाचा वापर करावा, उघड्यावर शौचास जाऊ नये,  शहराचे आरोग्य धोक्यात  येणार नाही याची दक्षता घ्यावी. शहर परिसरात जे  उघड्यावर शौचास दिसतील  त्यांची नावे ०८००५९९२६९९  या टोल फ्री क्रमांकावर  सांगावीत - भागवत बिघोत, मुख्याधिकारी, गेवराई  
 
स्वच्छतेचे स्वप्न पूर्ण 
स्वच्छ गेवराई  सुंदर गेवराई’ हे ब्रीद घेऊन आम्ही मागील  दहा वर्षांपासून शहरात  काम करत असून  माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आजी-माजी नगरसेवक  यांच्या मेहनतीमुळे ही योजना पूर्णत्वाकडे जात आहे - सुशील जवंजाळ, नगराध्यक्ष, गेवराई.    
बातम्या आणखी आहेत...