आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मराठवाड्यात वाॅटर ग्रीडची अंमलबजावणी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेवराई - मराठवाड्यात पाण्याचा थेंब वाया जाऊ नये म्हणून विभागात वाॅटर ग्रीडची अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यामुळे पाण्याची गळती व नासाडी होणार नाही. गेवराई शहराचा विकास पाहून हे शहर मराठवाड्यात नंबर एकचे माॅडेल करण्यासाठी मी व पालकमंत्री हे शहर दत्तक घेत आहोत, असे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले.
सोमवारी गेवराई नगर परिषदेच्या नवीन इमारतीचे लोकार्पण व पाइपलाइनच्या कामाच्या शुभारंभप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. मंचावर पालकमंत्री पंकजा मुंडे, खासदार प्रीतम मुंडे, आमदार अॅड. लक्ष्मण पवार, आर. टी. देशमुख, संगीता ठोंबरे, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, सीईओ नामदेव नन्नावरे, अादित्य सारडा, रमेश पोकळे, गीता पवार, नगराध्यक्ष महेश दाभाडे, प्रकाश सुरवसे आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, गेवराई शहराचा विकास करण्यासाठी माझ्याकडे असलेल्या नगरविकास खात्याकडून अधिक निधी दिला जाईल, ग्रामीण भागातील नागरिकांचा शहराकडे ओघ सुरू आहे. शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधा देणे प्रत्येक नगरपालिकेची जबाबदारी आहे. रस्ते करून विकास होत नाही तर शाश्वत विकास झाला पाहिजे हे गेवराई नगरपालिका व आमदार लक्ष्मण पवार यांनी दाखवून दिले आहे. गेवराईतील संजयनगर व अन्य भागांत २० वर्षांपासून राहत असलेल्या नागरिकांना तीन महिन्यांत स्वत:च्या घराची मालकीहक्क असलेले पी. आर. कार्ड मिळतील, असे फडणवीस म्हणाले. प्रास्ताविक आमदार पवार यांनी केले.
कार्यकर्ते भाजपत दाखल
या कार्यक्रमातच आमदार अमरसिंह पंडित यांच्या गटाचे दादासाहेब घोडके, बाळासाहेब सानप, कृष्णा मुळे, राहुल खंडागळे, शांतीलाल पिसाळ, राधेश्याम खंडागळे, विनोद निकम तर माजी मंत्री बदामराव पंडित गटाचे जानमहंमद बागवान यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी भाजपत प्रवेश केला.
विकासकामे सुरू झाली
^बीड जिल्ह्यात पूर्वी कोट्यवधी रुपयांचा निधी येत होता, परंतु तो कागदोपत्री खर्च दाखवून खड्डे कसे राहतील यासाठी प्रयत्न झाला. आमचे सरकार आल्यापासून बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात निधी येऊन विकासकामे सुरू झाली आहेत.
पंकजा मुंडे, ग्रामविकासमंत्री, बीड
बातम्या आणखी आहेत...