आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्र्यांकडून धनंजय मुंडे यांचे सांत्वन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परळी- राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते पंडितअण्णा मुंडे यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची परळी येथील निवासस्थानी भेट घेऊन सांत्वन केले. या वेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस हे मुंडे कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी परळी येथे आले होते. त्यांच्या समवेत भाजपचे संघटन मंत्री श्रीकांत भारतीय, आमदार आर.टी.देशमुख, भाजप नेते फुलचंदराव कराड हे उपस्थित होते.

फडणवीस यांनी पंडितअण्णा मुंडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली अर्पण केली. तत्पूर्वी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, एमआयटीचे राहुल कराड यांनीही धनंजय मुंडे यांची भेट घेऊन सांत्वन केले. आ. सुधाकर भालेराव उपस्थित होते.
यशश्री निवासस्थानीही भेट : पंडितअण्णा मुंडे यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी परळी येथील यशश्री निवासस्थानी भेट देऊन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे कुटुंबीयांचे सांत्वन केले.
बातम्या आणखी आहेत...