आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काळ्या धनाच्या लढाईत जनतेने सहकार्य करावे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड - नोटबंदीवरून सुरू असलेल्या काळ्या धनाच्या लढाईत जनतेने सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी केले. ते देगलूर येथे आयोजित नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारसभेत बोलत होते. या वेळी आमदार सुभाष साबणे, भास्करराव पाटील खतगावकर, जिल्हाध्यक्ष राम पाटील रातोळीकर उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, वाढत चाललेले नागरीकरण व समस्या यांचे निराकरण करत गेल्या दीड वर्षात राज्यातील सुमारे १०० शहरे हागणदारीमुक्त केली. २०१७ मध्ये राज्यातील दोनशे शहरे हागणदारीमुक्त करण्याचा मानस आहे. देशात साठेबाज लोकांनी प्रचंड प्रमाणात काळा पैसा जमा केला आहे. तो पैसा बाहेर काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लढा सुरू केला आहे.
हा लढा केवळ ५० दिवसांचा आहे. त्यानंतर मोठ्या प्रमाणात काळा पैसा बाहेर येणार आहे. हा काळा पैसा जनतेच्या हितासाठी वापरण्यात येणार आहे. यासाठी जनतेने सहकार्य करावे, असे आवाहनही फडणवीस यांनी केले. देगलूर तालुक्यातील लेंडी प्रकल्प, नांदेड-बिदर रेल्वेचे काम हे प्रश्न लवकरच सोडवण्यात येतील. याबरोबरच देगलूर शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी या वेळी दिली. या वेळी नगराध्यक्षपदाचे उमेदवार गंगाधरराव जोशी यांनी शहराच्या विकासाचा आराखडा, कसा असेल, असे सांगितले.
बातम्या आणखी आहेत...