आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चारा निर्यातबंदी उठवणार: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - पशुधन वाचवण्यासाठी बीड जिल्ह्यातील चारा छावण्यांना चाराटंचाईला तोंड द्यावे लागत असून चारा उपलब्ध करून देण्यासाठी सोलापूरसह पुणे जिल्ह्यातील चारा निर्यातबंदी उठवण्याचे निर्देश संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येतील, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

तालुक्यातील पालवण येथील गुरांच्या छावणीवर यशवंत बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व मराठवाडा लोकविकास मंचच्या वतीने दुष्काळग्रस्त शेतकरी व शेतमजूर कुटुंबांतील ४० वधू-वरांच्या सामुदायिक विवाह सोहळ्याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. या वेळी मंचावर शिवसंग्रामचे आमदार विनायक मेटे, पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने, आमदार प्रशांत बंब, प्रकाश महाराज बोधले, नारायणगडाचे मठाधिपती शिवाजी महाराज, विभागीय आयुक्त उमाकांत दांगट, शिवसंग्रामचे युवक प्रदेशाध्यक्ष राजेंद्र मस्के आदी उपस्थित होते.

यापूर्वीचे अधिकारी चालढकल करायचे. शेतकऱ्यांसाठी आम्ही दोन रुपये किलो गहू व तीन रुपये किलो दराने तांदूळ देण्याचा निर्णय घेतला. शेतकऱ्यांसाठी अन्नसुरक्षा राबवली आहे. अर्थसंकल्पात २६ हजार कोटी रुपये राखून ठेवले. यापूर्वीच्या सरकारने फक्त १५ हजार कोटी रुपयांची तरतूद केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...