आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जालन्यात होणार सीड पार्क, राज्यात पाच लाख शेततळी, मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना - ‘सीड बास्केट’ अशी ओळख असलेल्या जालन्यात सीड पार्क उभारण्यासाठी राज्य सरकार गुंतवणूक करणार आहे. दर्जेदार बियाणे तयार व्हावे, बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना लाभ व्हावा हा यामागचा उद्देश आहे. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यात ३० टक्के गुंतवणूक राज्य सरकार तर ५० टक्के गुंतवणूक पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप अर्थात पीपीपीमधून केली जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केली. तसेच राज्यभरात ५ लाख शेततळी उभारणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

जालन्याच्या कलश सीड्सच्या जीनोमिक्स लॅबचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यानंतर त्यांनी भाजीपाला प्रदर्शनाला भेट दिली, शेतकरी मेळाव्यात मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे होते. पालकमंत्री बबनराव लोणीकर, आमदार अर्जुन खोतकर, राजेश टोपे, संतोष दानवे, नारायण कुचे, चैनसुख संचेती, जि.प.अध्यक्ष तुकाराम जाधव आदींची उपस्थिती होती.

नगराध्यक्षा पार्वताबाई रत्नपारखे, विभागीय आयुक्त उमाकांत दांगट, कलश सीड्सचे सुरेश अग्रवाल, समीर अग्रवाल आदींची प्रमुख उपस्थिती होती.


मेळाव्याला दोन तास उशीर
मुख्यमंत्र्यांच्या नियोजित दौऱ्यानुसार दुपारी २ वाजता मेळावा सुरू होणार होता. मात्र जवखेडा येथून कलश सीड्स येथे आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी बिझनेस मीटमध्ये जिल्ह्यातील व्यापारी, उद्योजक आणि प्रगतिशील शेतकरी यांच्याशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी भाजीपाला प्रदर्शनाची पाहणी केली त्यामुळे शेतकरी मेळावा २ तास उशिराने ४ वाजता सुरू झाला.

मुख्यमंत्री म्हणाले, सिंचनाची शाश्वत सुविधा असल्याने मध्य प्रदेशाचा कृषी विकासदर २४ टक्के आहे. त्यासाठी तेथे तीन लाख शेततळी तयार करण्यात आली आहेत. महाराष्ट्राचा कृषी विकासदर वाढवण्यासाठी मागेल त्याला शेततळे योजनेतून आगामी वर्षभरात पाच लाख शेततळी निर्माण केली जातील. जलयुक्त शिवार योजनेतून पाच वर्षांत २० हजार गावांत पाणी अडवण्यासाठी कामे केली जातील. आगामी काळात शेती क्षेत्रात पाच हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार अाहेे. सिंचनासाठी पाणी, शेतकऱ्यांना नियमित वीज, दर्जेदार बियाणे आणि शेतमालाला चांगली बाजारपेठ मिळवून देण्यास सरकारचे प्राधान्य असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

विकासाचा बॅकलॉग भरून काढला जाईल
औरंगाबाद डीएमआयसीत १,४०० कोटी, तर जालन्याच्या ड्रायपोर्टमध्ये प्रारंभी ४०० कोटींची गंुतवणूक होत आहे. औरंगाबाद-जालना शहरे १० वर्षांत ट्विन सिटी म्हणून उदयास येतील, असे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे म्हणाले. जालना शहराच्या अंतर्गत जलवाहिनीसाठी १४५ कोटी रुपये मंजूर झाले आहेत.

मराठवाड्यात ५ टेक्स्टाइल पार्क
मराठवाडा-वैदर्भीय कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्यात ११ टेक्स्टाइल पार्क उभारले जात आहेत. पैकी पाच पार्क मराठवाड्यात आहेत. यात कापसापासून कापड व फॅशन गारमेंट तयार करण्याचा उद्देश आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित कार्यक्रमाचे Photos