आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्री एकाच दिवशी दोनदा बचावले..हेलिकॉप्टर अपघाताआधीही झाली असती दुर्घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हेलिकॉप्टर अपघात होणार याचे संकेत त्याच ठिकाणी अवघ्या काही मिनिटांपूर्वी मिळाले होते. फडणवीस येथील हलगरा गावात एका झाडाखाली थांबून उभे राहून गावकऱ्यांशी संवाद साधत होते. त्याचवेळी त्यांच्या डोक्यावरील एक फांदी तुटलेली असल्याचे वेळीच स्थानिकांच्या निदर्शनास आले. त्यांनी मुख्यमंत्र्यांना बाजूला होण्याचे आवाहन सुद्धा केले. मात्र, मुख्यमंत्र्यांनी त्यांना हसत मुखाने उत्तर दिले, की तुमच्या सारख्यांचे आशीर्वाद आणि त्या आशीर्वादांची अदृश्य ढाल माझ्या पाठीशी असताना मला काहीच होणार नाही. याच्या काही मिनिटांनंतरच मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाले आणि ते यातून बालंबाल बचावले आहेत.
 
नेमके काय झाले?
श्रमपरीहारानंतर मुख्यमंत्र्यांनी गांवकऱ्यांसोबत एका झाडाखाली संवाद साधला. 
मुख्यमंत्री ज्या आंब्याच्या झाडाखाली उभे राहून उपस्थितांशी संवाद साधत होते, अगदी त्याच ठिकाणी त्यांच्या डोक्यावर एक तुटलेली फांदी कुठल्याही वेळी पडेल अशा अवस्थेत होती. त्या फांदीकडे एका ग्रामस्थाचे आणि पत्रकाराचे लक्ष गेले आणि ते मुख्यमंत्र्यांना म्हणाले 'आपण थोडे बाजूला उभे रहा, आपल्या डोक्यावरची फांदी तुटीलेली आहे. ती आपल्या डोक्यावर पडेल.' त्यावर मुख्यमंत्री जागेवरुन थोडेसे बाजूला हेात म्हणाले. 'घाबरु नका, मला काही होणार नाही. तुमच्या सारख्या अनेकांचे आशीर्वाद आणि आशीर्वादांची अदृश्य ढाल. माझ्या पाठीशी असताना मला काही होणार नाही.' त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपले भाषण सुरूच ठेवले आणि आपले महाराष्ट्राच्या विकासाचे स्वप्न लोकांपुढे मांडत राहिले.
 
प्रत्यक्ष फावडे, टोपले हातात घेऊन श्रमदान
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. निलंगा तालुक्यातील हलगरा या गावांत लोकसहभागातून करण्यात आलेल्या जलयुक्त शिवार योजनेखाली झालेल्या कामांची पाहणी करण्यासाठी त्यांचा हा दौरा होता. मुख्यमंत्री हलगरा येथे येताच सर्वप्रथम त्यांनी श्रमदान केले. मुख्यमंत्र्यांनी आल्या-आल्या हातात फावडे आणि टोपले घेऊन श्रमदानाला सुरूवात केली. केवळ हातात फावडे घेऊन फोटोपुरते श्रमदान न करता त्यांनी तब्बल 20 ते 25 मिनिटे श्रमदान केले. फावड्याने 1 ते 2 फुट खोदले आणि निघालेली माती स्वत: उचलून बांधावर टाकली.
बातम्या आणखी आहेत...