आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीड पार्कसाठी15 दिवसांत जागेचे संपादन करण्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना- सीड पार्कच्या उभारणीसाठी अगोदरच खूप विलंब झालेला आहे. त्यामुळे या कामाला गती देण्याची आवश्यकता आहे. या पार्कसाठी आवश्यक जागेचे संपादन पुढील १५ दिवसांत पूर्ण करा, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना दिल्या. त्यामुळे या प्रकल्पाच्या कामाला गती मिळेल, असा विश्वास व्यक्त होतो आहे. 
 
जालना शहरातील अंतर्गत पाणीपुरवठा योजनेच्या कामाचे भूमिपूजन शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी सीड पार्कच्या कामाला गती देण्याच्या सूचना केल्या. जालन्यात आयसीटी या देशातील अग्रगण्य संस्थेची शाखा सुरू होत आहे. त्यामुळे जगभरातील उद्योग जालन्यात येतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. प्रस्तावित समृद्धी महामार्गाचा सर्वाधिक फायदा जालना-औरंगाबादला होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सीड पार्कच्या उभारणीसाठी वेग देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी या वेळी प्रशासनाला केल्या. 
बातम्या आणखी आहेत...