आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सीएम फडणवीसांच्या पायलटची दादागिरी, धक्काबुकी करत निवडणूक पथकाचा कॅमेराही फोडला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोट - अकोट नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अकोट शहरात आले होते. त्यांना घेऊन येणाऱ्या हेलिकॉप्टरच्या पायलटने दादागिरीचा परिचय देत आचारसंहिता पथकाचा कॅमेरा फोडल्याची घटना शुक्रवारी घडली.

पालिका निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. शेवटच्या टप्प्यात प्रचार आला असताना भाजपच्या उमेदवारांच्या प्रचाराकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शहरात आले होते. त्यामुळे प्रशासनाने सर्व बाजूने तयारी केली होती. पोपटखेड मार्गावर हेलिकॉप्टर उतरण्याची व्यवस्था केली होती. मुख्यमंत्री हेलिकॉप्टरमधून उतरले व वाहनात बसून सभास्थळी रवाना झाले. दरम्यान, आचारसंहिता पथकाचा या ठिकाणी कॅमेरामन होता. मुख्यमंत्री रवाना होताच पायलट पथकाजवळ आला. त्याने कॅमेरामनला शूटिंग का करतो, अशी विचारणा करत कॅमेरा जमिनीवर आदळला. घडलेल्या प्रकारामुळे सर्वच अवाक् झाले. या प्रकाराची माहिती उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आली असून वृत्त लिहीपर्यंत कायदेशीर कारवाई करण्यात आली नाही. पायलटच्या दादागिरीचा विषय दिवसभर शहरात रंगला होता.
विरोधकांची टीका
या प्रकारामुळे विरोधी पक्षाला बोलण्याची आयतीच संधी चालून आली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मुख्यमंत्री अशोक चव्हाण, काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई, माजी राज्यमंत्री रामदास बोडखे यांनी भाजपवाल्यांची दादागिरी कशी सुरू आहे, असे सांगून चांगलेच तोंडसुख घेतले.
बातम्या आणखी आहेत...