आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपहरण :गुणवत्ता यादी पाहण्यासाठी कॉलेजात गेला, तो घरी परतलाच नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोयगाव - शहरातील संत ज्ञानेश्वर महाविद्यालयात शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्याचे चार अज्ञातांनी अपहरण केल्याची घटना मंगळवारी घडली. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली. याप्रकरणी बुधवारी चार अज्ञात आरोपींविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपहरण का करण्यात आले याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. या घटनेमुळे महाविद्यालयाची सुरक्षा धोक्यात आली आहे. अजय रमेश पाटील (१७, रा. माळेगाव पिंप्री) असे अपहरण झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.

अजय हा महाविद्यालयात इयत्ता बारावीत व्यावसायिक अभ्यासक्रमात शिक्षण घेत होता. तो मंगळवारी जरंडी येथून बसने सोयगावच्या महाविद्यालयात बारावीची गुणवत्ता यादी पाहण्यासाठी आला होता. तो रात्री उशिरापर्यंत घरी परतलाच नाही. कुटुंबीयांनी रात्रभर सर्वत्र शोध घेतला, परंतु त्याचा शोध लागला नाही. बुधवारी सकाळी पिता रमेश पाटील यांनी सोयगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी अजयचा मोबाइल ट्रेस केला असता तो वाहनातून फर्दापूरच्या दिशेने जात असल्याची माहिती मिळाली. त्यावरून त्याचे अपहरण झाले असल्याचा पालकांचा संशय आहे. या प्रकरणामुळे महाविद्यालय व बसस्थानक परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त बुधवारी तैनात करण्यात आला होता. शोधासाठी पोलिसांची दोन पथके नाशिक व औरंगाबादकडे रवाना झाली आहेत. दरम्यान, अपहरण झालेल्या विद्यार्थ्याचे फोटो व वर्णन जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांना कळवण्यात आले असल्याचे एपीआय सहाने यांनी सांगितले. याप्रकरणी उपनिरीक्षक गणेश जागडे, भागीनाथ वाघ, दिलीप पवार, दिलीप तडवी, कपिल बनकर, सुभाष पवार आदी तपास करत आहेत.
माहिती गोळा करण्याचे काम सुरू
^महाविद्यालयातून अपहरण झालेला अजय हा १२ रोजी महाविद्यालयात आला होता की नाही याबाबत साशंकता आहे. त्याची माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे.
- संजय सहाने, एपीआय, सोयगाव ठाणे
महाविद्यालयात तातडीची बैठक
संत ज्ञानेश्वर महाविद्यालयातून शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्याचे अपहरण झाल्याची घटना घडल्यावर महाविद्यालयातील कनिष्ठ विभागाच्या सर्व प्राध्यापकांनी तातडीची बैठक घेऊन याविषयी उपाययोजनांवर चर्चा केली. बैठकीत काय चर्चा झाली हे कळू शकले नाही.
बातम्या आणखी आहेत...