आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुष्काळातही वडिलांचे प्रयत्न, मी कमी पडलो; विद्यार्थ्याची आत्महत्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर- लातूर तालुक्यातील मुरूड येथे महाविद्यालयीन विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी रात्री घडली. याप्रकरणी मुरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विजय नवनाथ जाडकर (२१) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो मुरूडच्या संभाजी महाविद्यालयात बी.कॉम. द्वितीय वर्षात शिकत होता. तो मुरूडच्याच शिवाजीनगर भागात आई-वडिलांसह राहत होता. त्याचे आई-वडील मजुरी करतात. रात्री त्याने घरातील खोलीत दोरीने गळफास घेतला. ही बाब त्याचा चुलतभाऊ गणेश जाडकर याला समजल्यानंतर त्याने पोलिसांना कळवले. त्यानंतर मुरूड ठाण्यातील पोलिसांनी पंचनामा केला.मृत विजयने चिठ्ठी लिहून ठेवली असून, त्यात म्हटले आहे की, ‘आई-वडिलांनी दुष्काळी परिस्थितीत माझेे शिक्षण पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. परंतु मी त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यात कमी पडलो. माझ्या मरणाला मीच जबाबदार असल्याने कोणालाही कारणीभूत ठरवू नये.’
बातम्या आणखी आहेत...