आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
माजलगाव (जि. बीड)- शरद पवारांना एनडीएसोबत यायचे होते; पण आपण त्याला कडाडून विरोध केल्याचा गौप्यस्फोट भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी माजलगाव येथे रविवारी केला. देशभरात सध्या परिवर्तनाची लाट निर्माण झाली आहे. यामुळेच शरद पवारांनी नरेंद्र मोदींची भेट घेतली. ही भेट घेण्यासाठी पवारांना दहा वर्षांत वेळ मिळाला नाही का, असा टोमणा मारतानाच निवडणुकीआधी राष्ट्रवादीशी कधीही समझोता करणार नाही, असे मुंडे यांनी स्पष्ट केले.
माजलगावातील मोंढा मैदानावर दारिद्रय़ रेषा परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी मुंडे बोलत होते. मुंडे म्हणाले, आम्ही पाच पांडवांनी भाजप, शिवसेना, रिपाइं, स्वाभिमानी संघटना आणि रासपने युती केली आहे. आता कोणाचीही गरज नाही. बीडमध्ये माझ्याविरुद्ध उमेदवार शोधण्यासाठी शरद पवार व अजित पवार तीन ते चार महिन्यांपासून मायक्रोस्कोप घेऊन बसले आहेत; पण जिल्ह्यातील अर्धी राष्ट्रवादी माझ्याकडून असल्याने एकही उमेदवार तयार होत नाही. त्यांना उमेदवार मिळाला, तरी मी लाखो मतांच्या आघाडीने निवडून येईन.
अशाने गरिबी दूर होत नाही
युवराज समजणारे राहुल गांधी एक दिवस झोपडीत जाऊन राहिले. तेथे जेवण केले. अशाने गरिबी दूर होत नाही. देशात आजही 50 टक्के जनता उपाशीपोटी झोपते. काँग्रेस सरकार केवळ योजना आणत आहे व मंत्री फस्त करत आहेत, असा आरोप त्यांनी केला.
दलालांना जेलमध्ये घालणार
दारिद्रय़ रेषेच्या यादीत आजही आमदार, खासदारांची नावे आहेत. खरे लाभार्थी यापासून वंचित आहेत. दलालांमुळे गरिबांपर्यंत धान्य पोहोचत नाही. त्यामुळे दलालांना जेलमध्ये घालण्याचे काम मी करणार आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.