आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्तेची तीन वर्षे पूर्ण; भाजप-शिवसेनेचे एकमेकांवर शरसंधान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंगोली- येथे शनिवारी शिवसेनेच्या वतीने संपर्कप्रमुखांच्या उपस्थितीत बैठक झाली तर भाजपने सत्तेची तीन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल  जाहीर कार्यक्रम घेतला. या दोन्ही सत्ताधारी पक्षांनी आपल्या कार्यक्रमात एकमेकांवर टीका करून आम्हीच मोठे असल्याचे ठासून सांगण्याचा प्रयत्न करतानाच आगामी निवडणुकांसाठी तयार राहण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना केल्या.   हे दोन्ही कार्यक्रम एकाच दिवशी आणि एकाच वेळी परंतु वेगवेगळ्या ठिकाणी झाले. राज्यस्तरावर दोन्ही मित्रपक्षांत चालू असलेली रस्सीखेच या स्थानिक पातळीवरील कार्मक्रमातसुद्धा पाहायला मिळाली. तसेच आम्हीच मोठे असल्याचा दावा करून एकमेकांना औकात दाखवण्याची भाषा केल्याने सामान्य मतदारांची मात्र चांगलीच करमणूक होत आहे. 
 
भाजपवर जनता नाराज
 महाराष्ट्रात शिवसेना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचलेला पक्ष असून बाळासाहेबांचा शिवसैनिक कोणाच्याही तुलनेत सरस आहे. भाजप नेत्यांनी निवडणुकीत दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत. त्यामुळे सामान्य जनता आणि शेतकरी नाराज असून अन्यायाला वाचा फोडण्याचे काम आम्ही करू, असे सांगतानाच आगामी निवडणुका कधीही होवो, शिवसैनिकांनी आपण स्वतःच उभे राहणार असे समजून कामाला लागण्याचे आवाहन संपर्कप्रमुख आनंद जाधव यांनी केले.या वेळी जिल्हाप्रमुख बांगर, सहसंपर्कप्रमुख शिंदे आदी पदाधिकाऱ्यांचीही भाषणे झाली. त्यांनी भाजपलाच लक्ष्य केले.  शासकीय विश्रामगृहात आज दुपारी २ वाजता  शिवसेनेच्या वतीने संपर्कप्रमुख आनंद जाधव यांच्या उपस्थितीत शिवसैनिकांचा मेळावा घेण्यात आला. तर याच वेळात भाजपने सत्तेला तीन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल संपर्क कार्यालयाजवळ कार्यक्रम घेतला.
 
त्यांच्याकडे सांगण्यासारखे  नाही
 सत्तेत राहून विरोधी पक्षाचे काम करणारे लोक जनतेच्या दरबारात फेल ठरले असून त्यांना आता सांगण्यासारखे काही उरले नसल्याने ते आमच्यावर टीका करीत आहेत. परंतु त्यामुळे आमचे काहीच नुकसान होणार नसून त्यांचेच त्यात नुकसान असल्याची टीका भाजपने केली. या वेळी माजी खासदार शिवाजी माने यांनाही दोन्ही काँग्रेससह शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला. मित्रपक्ष शिवसेनेला काही नीतिमत्ता राहिली नसल्याने त्यांनी सहकारी पक्ष भाजपलाच लक्ष्य करण्याचे सत्र चालवले आहे. परंतु त्यामुळे तुमचाच घात होईल आणि मतदार सपाटून खाली पाडतील, असा टोलाही माजी खासदार शिवाजी माने यांनी लगावला. या वेळी भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे, माजी आमदार गजानन घुगे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांच्यासह स्थानिक नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी बोलताना आमदार तथा जिल्हाध्यक्ष तानाजी मुटकुळे यांनी, भाजपच्या कामाचा पाढा वाचून भाजप पाच वर्षांची सत्ता बिनधोक पूर्ण करेल, असा विश्वास व्यक्त केला.
 
बातम्या आणखी आहेत...