आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Congress Doesn't Want To Put Adarsh Report Before Assembly Phadanvis

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काँग्रेसने आदर्शचा अहवाल जाणीवपूर्वक मांडला नाही, देवेंद्र फडणवीसांचा आरोप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड - काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री आणि काही विद्यमान मंत्री अडचणीत येऊ नयेत यासाठीच ‘आदर्श’चा चौकशी अहवाल विधिमंडळात मांडण्यात आला नाही. या अहवालाचे पडसाद संसदेतही उमटले असते म्हणून मुख्यमंत्र्यांनी हा अहवाल समोर येऊ दिला नाही, असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार देवेंद्र फडणवीस यांनी केला.

रविवारी सकाळी भाजपचे कार्याध्यक्ष राम पाटील रातोळीकर यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. फडणवीस म्हणाले, आदर्श सोसायटीत अनेक बेनामी फ्लॅट आहेत. ते शोधण्याच्या बाबतीत आयोग फार खोलात गेलेला नाही, परंतु मी 12 जणांच्या बँक अकाउंटबद्दल माहिती दिली आहे. त्याची सखोल चौकशी केली तर पैसा कोणत्या खात्यातून कोणाच्या खात्यात कसा वळता झाला हे उजेडात येईल. सीबीआयला याबाबतीत काही पुरावे हाती आले मुख्यमंत्र्यांनी आयोगाचा अहवाल अधिवेशनात मांडण्याचे आश्वासन देऊन ते पाळले नाही. त्यांनी विश्वासघात केला. मुख्यमंत्र्यांच्या स्वच्छ प्रतिमेचा बुरखा फाटला असून भ्रष्टाचाराला पाठीशी घालणारे अशी नवी प्रतिमा समोर आली आहे. तीन महिन्यांपूर्वी अहवाल जवळ आला असतानाही ‘अँक्शन टेकन रिपोर्ट ’ तयार नाही, असे कारण मुख्यमंत्री सांगतात, परंतु ते अँक्शन घेणार कोणावर ? या अहवालात तर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे दोषी असल्याचे समोर येणार आहे.