आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress Get Majority In Nanded Agriculture Producing Committee

कृषी उत्पन्न बाजार समितीत नांदेडमध्ये काँग्रेसला बहुमत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड - नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या रविवारी झालेल्या निवडणुकीचे निकाल सोमवारी जाहीर झाले. १८ पैकी १३ जागा मिळवून काँग्रेसने समितीवर वर्चस्व प्रस्थापित केले. महायुतीला जागा मिळाल्या. तथापि काँग्रेस नेत्यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या व्यापारी मतदारसंघातील भाजपचे उमेदवार ओमप्रकाश पोकर्णा विजयी झाले. त्यामुळे काँग्रेसच्या विजयाला थोडी निराशेची झालर लागली.

रविवारी झालेल्या निवडणुकीत बाजार समितीच्या ९७ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीत व्यापारी मतदारसंघातून भाजपतर्फे माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा रिंगणात होते. त्यांना पराभूत करण्यासाठी काँग्रेसने कंबर कसली. आमदार डी. पी. सावंत, अमर राजूरकर, किशोर स्वामी, उपमहापौर शफी अहमद कुरेशी आदी दिग्गज नेत्यांनी प्रत्येक व्यापारी मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी घेऊन काँग्रेसला मतदान करण्याचे आवाहन केले. पोकर्णांच्या पराभवासाठी काँग्रेस नेत्यांनी सर्व तऱ्हेने प्रयत्नांची पराकाष्ठा केली. तरीही पोकर्णा विजयी झाले. बाजार समितीवर बहुमत मिळवूनही पोकर्णांच्या विजयामुळे काँग्रेस गोटात काहीसे निराशेचे सावट आहे.

काँग्रेसचे विजयी उमेदवार : बी.आर. कदम, पंजाबराव आढाव, तिरुपती कदम, श्रीराम कदम, विठ्ठल पाटील, पारूताई बोडके, अनिता क्षीरसागर, अशोक जिंके, गंगाधर निकम, दीपक पाटील, संभाजी पुयड, संजय लोणे, आनंदा कपाटे,

महायुतीचे विजयी उमेदवार : दत्ता मारुती कदम, भगवान पाटील आलेगावकर, ओमप्रकाश गणेशलाल पोकर्णा, सदाशिव माधवराव देशमुख, स्वामी सूर्यकांत महारुद्र.