आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपला झटका तर शिवसेना तगली; काँग्रेस अव्वल, राष्ट्रवादी 2nd

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्यातील नगर पंचायत, नगरपालिका निवडणुकीत सत्ताधारी भाजपला सपाटून मार खावा लागला आहे. एकूण १९ नगर पंचायतींमधील ३३१ जागांपैकी फक्त ३२ जागाच भाजपला जिंकता आल्या. याउलट सत्तेत असूनही भाजपशी कायमच चार हात दूर राहिलेल्या शिवसेनेने ग्रामीण भागात आपले अस्तित्व टिकवताना ५८ जागांवर यश मिळवले अाहे. सर्वात माेठा पक्ष हाेण्याचा मान मिळवलेल्या काँग्रेसला १०४ तर राष्ट्रवादी काँग्रेसने ८४ जागा मिळवून दुसरे स्थान मिळवले अाहे.

स्वबळावर निवडणुका लढविण्याचा हट्ट, शिवसेनेसह मित्रपक्षांना दिलेली दुय्यम वागणूक व दुष्काळ, महागाईच्या प्रश्नावर असलेली नाराजी या सर्वच बाबींमुळे भाजपला फटका बसल्याचा निष्कर्ष काढला जात अाहे. केंद्रात तसेच राज्यातील सत्तेच्या जोरावर आपणच स्थानिक निवडणुकांतही बाजी मारून नेऊ, या भ्रमात असलेल्या भाजपला ग्रामीण महाराष्ट्रातील लोकांनी दणका देताना काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या पारड्यात यशाचे भरभरून दान टाकले. विशेष म्हणजे कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, खान्देश तसेच विदर्भात कुठेच भाजपला फारसे यश मिळवता अालेले नाही. विधानसभा निवडणुकीत राज्यात सर्वात माेठा ठरलेला हा अपक्ष या १९ नगरपंचायतीत मात्र चाैथ्या क्रमांकावर फेकला गेला.

राज्यमंत्री शिंदेंना झटका
पालकमंत्री तथा गृह राज्यमंत्री राम शिंदे यांचा मतदारसंघ असलेल्या नगर जिल्ह्यातील जामखेड नगर पंचायतीतही मतदारांनी भाजपला माेठा झटका दिला अाहे. या निवडणुकीसाठी हिवाळी अधिवेशनानंतर त्यांनी जामखेडमध्येच मुक्काम ठाेकला हाेता, ते मंत्रालयाकडेही फिरकले नव्हते. भाजपला मित्रपक्ष महादेव जानकरांचा राष्ट्रीय समाज पक्षाची जामखेडात ताकद माेठी अाहे. मात्र भाजपने त्यांनाही किंमत दिली नाही. याचा परिणाम होऊन रासपने दिलेले तगड्या लढतीमुळे भाजपचे ६ उमेदवार पडले. याठिकाणी राष्ट्रवादीला २१ पैकी सर्वाधिक दहा जागा मिळाल्या. तर शिवसेना- भाजपला अनुक्रमे चार व तीन जागा मिळाल्या. माजी मंत्री सुरेश धस यांनी या ठिकाणी राष्ट्रवादीचे नेतृत्व केले हाेते.

निकाल किरकोळ : भंडारी
काँग्रेसने ज्या ठिकाणी सरशी मिळवली आहे ते त्यांचे पारंपारिक बालेकिल्ले आहेत. तेथे याआधी ९० टक्क्यांपेक्षा अधिक यश काँग्रेसला मिळत होते. उलट निकाल पाहता त्यांच्या यशाचे प्रमाण कमी झाले आहे. यामुळे एवढ्याशा निकालाने राजकीय भाष्य करणे योग्य नाही.
- माधव भंडारी भाजप मुख्य प्रवक्ते

नऊ ठिकाणी काँग्रेस
काँग्रेस बहुमताच्या अाधारे दिंडाेरी (नाशिक), हिमायतनगर, नायगाव (नांदेड), वाशी (उस्मानाबाद), काेरपना व जिवतीसह (चंद्रपूर) ९ ठिकाणी सत्ता स्थापन करेल. ३ ठिकाणी त्यांना राष्ट्रवादीची साथ लागेल. राष्ट्रवादी मानगाव, म्हसळा (रायगड) , जामखेड (नगर) सह ५ नगर पंचायतीत सत्ता स्थापन करू शकेल. २ ठिकाणी त्यांना काँग्रेसची मदत लागेल. शिवसेनेने तळा, पाेलादपूर सत्ता मिळवली. भाजपला १९ पैकी चंद्रपूर जिल्ह्यातील भाेंड पिंपरी व अाैंढा येथे सत्ता मिळवता येईल.

लोकांचा असंतोष दिसून आला : चव्हाण
लोकांच्या प्रश्नांशी आपला काही संबंध नसल्यासारखा फडणवीस सरकारचा कारभार असून वर्षभरात भाजपला लोक कंटाळले आहेत, हेच हा िनकाल दाखवतो. भाजपपेक्षा काँग्रेस बरी असे आता खेड्यापाड्यातील जनता बोलू लागली आहे.
- अशोक चव्हाण, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष
पुढे वाचा, मराठवाड्यातील सविस्तर निकाल..