आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वे, रस्ते नाही अन् जलवाहतुकीच्या पोकळ गप्पा, रजनी पाटील यांची नितीन गडकरींवर टीका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - रस्ते,वीज, रेल्वे या मूलभूत गरजांची पूर्तता करण्याऐवजी आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जलवाहतुकीचे जाळे विणण्याची पोकळ घोषणा केली आहे. रेल्वेसारखा जिव्हाळ्याचा विषय दुर्लक्षित करणारे हे सरकार या घोषणा सत्यात कधी उतरवणार? या शब्दांत काँग्रेसच्या खासदार आणि राष्ट्रीय प्रवक्त्या रजनी पाटील यांनी टीका केली आहे.
मागील आठवड्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देशातील १२१ नद्यांमधून जलवाहतूक करण्याची घोषणा केली, यात बीड जिल्ह्यातील मांजरा नदीचा उल्लेख आहे. यासंदर्भात खासदार रजनी पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, त्या म्हणाल्या, कोणत्याही कामात यू टर्न घेण्यात मोदी आणि त्यांच्या सरकारमधील मंत्री माहीर आहेत. काँग्रेसच्या काळात आज सत्तेवर असलेल्यांनीच भूसंपादन कायदा संमत होऊ दिला नाही. तीन वर्षे विरोध केला आणि आज सत्तेवर येताच यात शेतकरीविरोधी बदल करून हा कायदा संमत करून घेतला.
सोशल मीडियाचा भूलभुलैया करून सत्तेवर आलेले हे सरकार शेतकरीविरोधी आहे, याचा प्रत्यय दाखवून दिला. बीड जिल्ह्यातील परळी-नगर लोहमार्गाचा प्रश्न मार्गी लागणे गरजेचे असताना त्यासाठी निधीची तरतूद केली नाही. रस्त्याची अवस्था दयनीय आहे. लोकांना पाठदुखीचा त्रास होत आहे.

हे मूलभूत प्रश्न महत्त्वाचे असताना आता जलवाहतुकीची घोषणा केली, ती सत्यात कधी उतरणार की घोषणाच राहणार? अर्थसंकल्पात अनेक मागण्यांना कट मारण्यात आला. विमा विधेयकदेखील आमच्याच काळातील. आम्ही राज्यसभेत पाठिंबा दिल्याने ते संमत झाले. राज्यसभेचे अधिवेशन बरखास्त केल्याचे कळलेय. राज्यसभेत काँग्रेसचे बहुमत आहे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वक्तव्यावर चर्चेला मुद्दा आल्यानंतर आम्ही चर्चा करू. महाराष्ट्रातील अन्य राज्यांतील जनतेची दिशाभूल करणाऱ्या सरकारला जनतेच्या विरोधात निर्णय घेण्यापासून आम्ही रोखणार आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.