आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसचे खासदार राजीव सातवांना जोरदार दणका (महाकौल)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंगोली- काँग्रेसचे येथील खासदार राजीव सातव यांचे गाव मसोड येथे शिवसेनेने भगवा फडकविला आहे. त्यांच्या खरवड या जिल्हा परिषद व मसोड   या पंचायत समिती गणात अशा दोन्ही ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार निवडून आले आहेत.
 
गेल्या लोकसभा निवडणुकीत केवळ दीड हजारांच्या मताधिक्याने निवडून आलेल्या सातव यांना दोन महिन्यांपूर्वी पार पडलेल्या नगर परिषद निवडणुकीतही असाच दणका बसला आहे. ते राहत असलेल्या कळमनुरी नगर परिषदेवर शिवसेनेने एकहाती विजय मिळविला होता, तर त्यांनी पूर्वी नेतृत्व केलेल्या व सध्या त्यांचे विश्वासू आमदार संतोष टारफे यांच्या कळमनुरी विधानसभा क्षेत्राचा विचार केला तर तेथेही शिवसेनेने बाजी मारली आहे.
 
काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते असलेल्या सातव यांच्यासाठी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही धोक्याची घंटा समजली जात आहे.  वसमत विधानसभेचे आमदार डॉ. जयप्रकाश मुंदडा यांचा मतदारसंघ असलेल्या वसमतवर भाजपने झेंडा फडकवला आहे.
 
या ठिकाणी अॅड. शिवाजी जाधव यांच्या नेतृत्वाखाली भाजपने जिल्हा परिषदेच्या १२ पैकी ६ जागा जिंकल्या आहेत. तसेच पंचायत समितीवरही भाजपने एकहाती सत्ता काबीज केली. गेल्या विधानसभा निवडणुकीतही अॅड. जाधव यांनी पहिल्याच प्रयत्नात ५० हजारांवर मते घेऊन शिवसेना आणि राष्ट्रवादीसमोर आव्हान उभे केले होते.  
बातम्या आणखी आहेत...