आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेस-राकाँने खाल्ले दिलजमाईचे आइस्क्रीम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर - दोन वर्षांपूर्वी झालेल्या महापालिका निवडणुकीत एकमेकांचे गळे धरणेच शिल्लक ठेवलेल्या लातूरच्या काँग्रेस-राष्ट्रवादीने मंगळवारी रात्री ‘तुझा गळा-माझा गळा, गुंफू मोत्यांच्या माळा’चा राग आळवला. तासाभराच्या चर्चेनंतर प्रमुख नेत्यांनी गांधी चौकातील एका हॉटेलात दिलजमाईचे ‘आइस्क्रीम’ खात खात एकमेकांसोबत राहण्याच्या आणाभाका घेतल्या.

लातूरमध्ये बहुतांश ठिकाणी काँग्रेसची सत्ता आहे. इथली भाजप आणि शिवसेना निष्क्रिय असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची ओळख सत्ताधार्‍यांचे विरोधक अशी आहे. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना राष्ट्रवादी काँग्रेस फारशी आक्रमक नव्हती. मात्र, दुसर्‍यांदा मुख्यमंत्रिपदावरून पायउतार झाल्यानंतर विलासराव केंद्रात गेल्याचे पाहून राष्ट्रवादी काँग्रेस त्यातही अजित पवारांनी लातूरमध्ये लक्ष घातले. डॉ. पद्मसिंह पाटील यांचे चिरंजीव राणा पाटील यांच्याकडे लातूरचे प्रभारीपद दिले. जिल्हा परिषद निवडणुका एकमेकांच्या विरोधात लढल्या. विलासरावांची ताकद असलेल्या मांजरा कारखान्याच्या पट्टय़ात अजित पवारांनी सभा घेतल्या. पुढे मनपा निवडणुकीत तर भांडणाला सीमाच राहिली नाही.

दोघांनाही एकमेकांची गरज उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्याचा समावेश आहे. तसेच निलंगा तालुक्यातील 70 गावे उस्मानाबाद मतदारसंघामध्ये समाविष्ट आहेत. या भागात आमदार दिलीपराव देशमुख, शिवाजीराव निलंगेकर यांचा प्रभाव आहे, तर लातूर मतदारसंघात काँग्रेसला विजयासाठी राष्ट्रवादीची सोबत हवी आ