आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसने शेतकऱ्यांची चिंता करू नये: प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची टीका ,

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना- शेतकऱ्यांच्या प्रश्नांची भाजपला जाण आहे. त्यासाठी आम्ही अनेक वेळा लोकसभेत, विधानसभेत आणि रस्त्यावर उतरून संघर्ष केला आहे. आता काँग्रेस शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी करीत आहे, मात्र त्याचा शेतकऱ्यांना फारसा लाभ होणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना थेट लाभ होईल, अशा स्वरूपाची मदत देण्याचा सरकार प्रयत्न करीत आहे. आगामी अधिवेशनात त्याची घोषणा होऊ शकते. त्यामुळे काँग्रेसने शेतकऱ्यांची चिंता करू नये, असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी लगावला. ते जालना येथे पत्रकारांशी बोलत होते.
राज्यात ८० टक्के शेतकऱ्यांकडे पाच एकरपेक्षा कमी जमीन आहे. बँका एकरी ५ ते १० हजारांपेक्षा जास्त पीक कर्ज देत नाही. त्यामुळे केवळ कर्जमाफी केली तरी शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडणार नाही. त्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यास वैयक्तिक लाभ कसा होईल, यादृष्टीने सरकार प्रयत्न करीत आहे. त्यासाठी वेगवेगळे पर्याय आहेत. यात काही सवलती अाणि अनुदान देण्याचा विचार आहे,असे दानवे म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...