आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress State President Ashok Chavhan Visit Mantha Today

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आज मंठा शहरात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना- मंठा नगर पंचायतीच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांची शुक्रवारी मंठा येथे सभा होणार आहे. मंठा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर सायंकाळी सात वाजता ही सभा होणार आहे.

या वेळी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अरुण मुगदिया, माजी आमदार कैलास गोरंट्याल, माजी आमदार सुरेश जेथलिया, धोंडिराम राठोड, युवक काँग्रेसचे सरचिटणीस अन्वर देशमुख, जिल्हा परिषद सदस्य राजेश राठोड, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा आयेशा मुलानी, सेवादलाचे अध्यक्ष प्रशांत वाडेकर, युवक काँग्रेसचे समीर सत्तार, अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष बदर चाऊस यांची प्रमुख उपस्थिती राहील.