आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नांदेडमध्ये राहुल गांधी ताटकळले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड- तेलंगणातील निर्मल येथे जाण्यासाठी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे सायंकाळी ६.५० वाजता नांदेडच्या विमानतळावर आगमन झाले. त्यांना नेण्यासाठी हैदराबादहून निघालेला एसपीजीचा ताफा पोहोचायचा होता. त्यात एसपीजीचे अधिकारी होते. स्थानिक प्रशासनाने तैनात केलेला ताफा नेण्यास एसपीजीने नकार दिला. त्यामुळे हैदराबादहून एसपीजी येईपर्यंत राहुल यांना २० मिनिटे विमानतळावर थांबवून ठेवले, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक परमजितसिंह दहिया यांनी रात्री दै. "दिव्य मराठी'ला दिली.