आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Constant Government News In Marathi, Parali Vaijnath

स्थिर सरकारसाठी परळी येथील वैद्यनाथाला सात मित्रांचा नवस!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परळी वैजनाथ- केंद्रात बहुमताचे सरकार यावे, यासाठी केलेला नवस फेडण्यासाठी नाशिक आणि मुंबईतील सात व्यावसायिक मित्रांनी चार दिवसांपासून बारा ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेण्यासाठी प्रवास सुरू केला आहे. परळी येथील वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन या भाविकांनी नवसाची पूर्तता केली! बारा दिवसांत बारा ज्योतिर्लिंग दर्शनाचा विक्रमही ते करणार आहेत.

टाटा मोटर्सने दिलेल्या वाहनातून हे भाविक बुधवारी सकाळी परळी येथील वैद्यनाथ ज्योतिर्लिंग दर्शनासाठी आले होते. लोकसभा निवडणुकीपूर्वी विविध वृत्तवाहिन्यांनी केंद्रात त्रिशंकू स्थिती निर्माण होईल, असे भाकीत केले होते. अल्पमतातील सरकार सक्षमपणे निर्णय घेत नसल्यामुळे त्यातून मार्ग निघावा आणि केंद्रात बहुमताचे सरकार यावे, असा सूर प्रत्येक जणाकडून निघू लागला. यावर नंदकुमार देसाई (ग्रुप लीडर), डॉ. विश्वास सावकार, राजेंद्र फड, दीपक शिर्के, एस. मातृभूतम्, मुकेश पांडिया, विलास वाळके या सात मित्रांनी केंद्रात स्थिर सरकार आल्यास आपण बारा दिवसांत बारा ज्योतिर्लिंग दर्शन यात्रा करू, असा नवस केला. निवडणूक निकाल लागताच हे सातही मित्र ज्योतिर्लिंग दर्शन यात्रेच्या तयारीला लागले. संकल्प पूर्ण करण्यासाठी त्यांना टाटा गोल्ड कंपनीने आरामदायी वाहनही उपलब्ध करून दिले. प्रवासासाठी लागणार्‍या इंधनाचा खर्च पुणे येथील सॉइफ टेलिकॉम कंपनीने उचलला. रविवारी (ता. सात जून) नाशिक येथून सातही मित्र यात्रेवर निघाले. सोमवारी तामिळनाडूतील रामेश्वरम्, मंगळवारी आंध्र प्रदेशातील र्शीशैल्यम्, बुधवारी औंढा (जि. हिंगोली) येथील नागनाथ, परळीचा वैद्यनाथ, वेरूळचे घृष्णेश्वरहून पुढे भीमाशंकर क्षेत्री रवाना झाले.
गुरुवारी (ता. 12) गुजरातेतील सोरटी सोमनाथ आणि नागेश्वर, 14 जून रोजी मध्य प्रदेशातील ओंकारेश्वर आणि महाकालेश्वर, 15 जूनला उत्तर प्रदेशातील वाराणसी, तर 17 जूनला उत्तराखंडातील केदारनाथ, 20 जून रोजी नाशिकला परतण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
बारा दिवसांत बारा ज्योतिर्लिंगांना भेटी देऊन दर्शन घेण्याचा विक्रम करणार आहेत.
विश्वास निर्माण करणार
देशातील नऊ राज्यांतून दहा हजार किलोमीटरचा प्रवास करणार आहोत. शिवभक्तांना बारा दिवसांत बारा ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेता येऊ शकते, याचा विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. यातून वेळ आणि पैशाची मोठी बचत होऊ शकते. नंदकुमार देसाई, ज्योतिर्लिंग यात्रा लीडर.