आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संविधान हा देशाचा जगण्याचा आधार - जोगेंद्र कवाडे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना - संविधान हा देशाचा जगण्याचा आधार आहे. यात समता, बंधुता, करुणा ओतप्रोत भरलेली आहे. मात्र, देशाची एकात्मता व अखंडतेला तडा देण्याचे काम कुणी करत असेल तर ज्वालामुखी बनून त्याला भस्मसात करण्याची ताकद संविधानात असल्याचे प्रतिपादन प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात शुक्रवारी आयोजित संत शिरोमणी गुरू रविदास व्याख्यानमालेचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. या वेळी मंचावर डेव्हिड घुमारे, राजेंद्र हिवाळे, सुरेश रत्नपारखे, गणेश चांदोडे, नंदा पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. ‘धर्मांध शक्ती आणि वाढती असहिष्णुता’ या विषयावर बोलताना प्रा. कवाडे म्हणाले, संविधानात बदल करता येऊ शकतो, तर आरक्षणाची समीक्षा व्हावी, अशी मते काही लोक मांडत आहेत. यावर ज्या संविधानाची शपथ घेऊन तुम्ही सभापतीपदावर बसता, त्याच संविधानाच्या विरोधात बोलण्याची तुमची हिंमतच कशी होते, असा सवाल प्रा. कवाडे यांनी उपस्थित केला.
‘एैसा चाहु राज मैं जहाँ मिले सबको अन्न, छोट-बडे सम बसे, रविदास रहे प्रसन्न’ या गुरू रविदासांनी सांगितलेल्या दोह्यात समता, बंधुत्वाचा विचार आहे. यानुसार प्रत्येकाने अनुकरण करावे, तरच सर्व सुखी राहतील, असेही प्रा. कवाडे म्हणाले. प्रास्ताविक तान्हाजी जगताप, सूत्रसंचालन प्रा. विजय कुमठे यांनी केले.

आक्षेपार्ह घोषणा, ४० जणांवर गुन्हा
लातूर | आक्षेपार्ह घोषणा दिल्याच्या फिर्यादीवरून गांधी चौक पोलिस ठाण्यात शुक्रवारी ४० जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. शुक्रवारी सकाळी कांबळे चौकात ही घटना घडली. शिवजयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या चिंटू प्रतापसिंह बुंदील यांच्या नेतृत्वाखालील रॅलीतील काही युवक दुचाकीवरून दिलीप मारुती सातपुते यांच्या घराजवळ आले व त्यांनी अाक्षेपार्ह घोषणा दिल्याचे सातपुते यांनी फिर्यादीत म्हटले आहे.