आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वसमतमधील व्यापा-याचा सुपारी देऊन खून

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली - उसने घेतलेले पाच लाख रुपये देत नसल्यामुळे वसमत येथील आडत व्यापा-याचा केवळ पाच हजार रुपयांची सुपारी देऊन खून केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. याप्रकरणी सीडीआर (कॉल डिटेल्स रिपोर्ट) तंत्रज्ञानाद्वारे आरोपी व मृताच्या मोबाइलवरील कॉल तपासून दोन आरोपींना वसमत पोलिसांनी आज अटक केली.
वसमत येथील आडत व्यापारी कालिदास काकडे यांचा 30 जून रोजी खून करून मृतदेह पांगरा सती शिवारातील ओढ्यात फेकून दिला होता. मृतदेह ताब्यात घेण्यापूर्वी पोलिसांनी एका महिलेला ताब्यात घेतले होते. त्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी माणिक पेरके व वसमत पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सर्जेराव पाटील यांनी सी.डी.आर.तंत्रज्ञानाचा वापर केला. मृत व्यापा-याच्या मोबाइलवर 30 जुलै रोजीचे कॉल तपासले. त्यामध्ये पांडुरंग लोखंडे (30, लोखंडे पिंपळा ता.पूर्णा जि.परभणी) याने काकडे यांना कॉल केल्याचे दिसून आले. त्यानंतर वसमत पोलिसांनी लोखंडेला ताब्यात घेऊन चौकशी केली. लोखंडे व काकडे हे नातेवाईक असून उसने घेतलेले पैसे परत न दिल्याने काकडेंचा खून केल्याची कबुली लोखंडेने दिली.