आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बांधकामे, उद्योगांचे पाणी थांबवणार !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


बीड - दुष्काळाच्या झळा बीड जिल्ह्यातील नागरिकांना सोसाव्या लागत आहेत. दुष्काळावर मात करण्यासाठी राज्यातील बांधकामे, उसाचे आणि उद्योगाला दिले जाणारे पाणी थांबवून ते केवळ नागरिक आणि जनावरांना पिण्याला देण्यासाठी कठोर निर्णय घेतले जाणार असल्याची माहिती पाणीपुरवठामंत्री लक्ष्मण ढोबळे
यांनी दिली. बीड जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ढोबळे रविवारी आले होते. बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ते म्हणाले, राबवण्यात येणा-या पाणीपुरवठा योजनेत भ्रष्टाचार झाल्यास त्या-त्या गावातील सरपंचाने तक्रार द्यावी, संबंधितांवर तत्काळ गुन्हे दाखल करून कारवाई करण्याचे त्यांनी आदेश दिल्याचे त्यांनी सांगितले.

नागरिकांना शुद्ध व स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्रधिकरणाच्या जबाबदार अधिकारी, कर्मचा-यांनी शुद्ध पाण्यासाठी देखरेख ठेवावी. पाणीपुरवठा योजना नादुरुस्त व गळतीमुळे पाणी वाया जाते ते रोखून पाणी वाचवण्यासाठी तत्काळ दुरुस्तीच्या सूचना ढोबळे यांनी दिल्या. टॅँकर गाव, तांड्यावर जाण्यासाठी आमदार फंडातून रस्ते करण्यासाठीची मागणी आमदार धस यांनी बैठकीत केली. या वेळी बदामराव पंडित, अमरसिंह पंडित, पृथ्वीराज साठे, जि.प.चे अध्यक्ष सय्यद अब्दुल्ला, जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे, नगराध्यक्ष डॉ. दीपा क्षीरसागर, डॉ. भारतभूषण क्षीरसागर, माजी आमदार उषा दराडे आदी उपस्थित होते.