आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cops Suspended For Thrashing Farmer In Maharashtra

VIDEO: मागायला गेले पीक विमा, मिळाल्या लाठ्या ; दोन पोलिस निलंबित

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड/गेवराई - पीक विम्याचे पैसे भरण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला बेदम मारहाण करणारे पोलिस बी. डी. बजगुडे, पोलिस जमादार वाय. एन. बिनवडे यांना शनिवारी निलंबित करण्यात आले आहे. शेतकऱ्याला मारहाण करण्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात आला होता. एकीकडे जनतेचे रक्षक असलेले पोलिस निरपराध शेतकऱ्यावर तुटून पडले तर कोल्हापूरात पोलिसराजचा नमूना पाहायला मिळाला. चोरीच्या आरोपात ताब्यात घेण्यात आलेल्या युवकांना पोलिसांनी गुप्तांगात इंजेक्शन देऊन बेदम मारहाण केली.

काय आहे प्रकरण
दुबार पेरणीचे संकट ओढवले असताना यंदाच्या पीक विम्याचे पैसे भरण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या तलवाडा शाखेत गेलेल्या दोन शेतकऱ्यांना पोलिसांनी मारहाण केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी पाच वाजता घडली होती. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांवर कारवाईची मागणी करण्यात आली. शेतकऱ्याला निसर्गाने आधीच 'फटका' दिला असताना सर्वसामान्यांच्या मदतीसाठी असणारे पोलिसही त्यांच्यावर तुटून पडल्याने विरोधी पक्षांनी राज्य सरकारवर निशाणा साधला होता.
पोलिस अधीक्षक अनिल पारसकर यांनी शुक्रवारी चौकशीचे आदेश देत, 24 तासांत अहवाल पाठवण्यास सांगितला होता.

पुढील स्लाइडमध्ये, तीन वर्षांपासून दुष्काळाचा सामना