आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैजापुरात वाटल्या कापडी पिशव्या; नगरपालिकेनचा शहरात कॅरीबॅगमुळे होणारे प्रदूषण टाळण्याचा प्रयत्न

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैजापूर - नगरपालिकेच्या पुढाकारातून शहर परिसराला प्लास्टिक कॅरीबॅग वापराच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी हाती घेतलेल्या पर्यावरणपूरक अभियानात मंगळवारी नागरिकांना प्लास्टिक कॅरीबॅग्जमुळे होणारे प्रदूषण टाळण्यासाठी पालिका प्रशासनाने कापडी पिशव्यांचे घरोघरी वाटप करण्याची मोहीम हाती घेतली आहे. पालिकेच्या नगराध्यक्षा नगरसेवकांच्या हस्ते प्रभाग क्रमांक मधील ईदगाह, शिवाजीनगर,दर्गावेस या भागातील नागरिकांना कापडी पिशव्यांचे मोफत वाटप करून त्यांना कॅरीबॅग वापरण्याचे आवाहन या वेळी करण्यात आले.
शहरातील १२ हजार मालमताधारकांना ते २१ ऑगस्टदरम्यान कापडी पिशव्याचे वाटप नागरिकांना करण्याचे नियोजन पलिका प्रशासनाने आखले आहे. नगराध्यक्ष शिल्पा परदेशी, विरोधी पक्षनेते साबेरखान, नगरसेवक बाळासाहेब संचेती, नगरसेविका सिंधुबाई वाणी, अन्नपूर्णा जेजूरकर,मुख्याधिकारी बी. यू. बिघोत, माजी शिक्षणाधिकारी धोंडिरामसिंग राजपूत, भांडारपाल वाल्मीक शेटे, सहायक स्वछता निरीक्षक प्रमोद निकाळे , अकिल शेख, परेश आसर,खलील शहा, राजू पठाण यांनी कापडी पिशव्या वाटल्या.
पालिकेच्या अभियानाला अनेकांचा हातभार
पालिकेनेशहरात प्लास्टिक कॅरीबॅग वापराला आळा घालण्यासाठी पर्यावरण हिताचे अभियान हाती घेतले आहे. या अभियानात नागरिकांना खरेदीसाठी कापडी पिशव्या उपलब्ध करून देण्यासाठी सेवाभावी संस्था, व्यापारी काहीजण वैयक्तिक स्वरूपात पदरमोड करून २१ हजार कापडी पिशव्या वाटपासाठी पालिकेला दिल्या आहेत.
शहरातील प्रभाग मधील नागरिकांना कापडी पिशव्याचे मोफत वाटप करताना नगराध्यक्ष शिल्पा परदेशी.
अभिनव उपक्रम
बातम्या आणखी आहेत...