आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Corruption In Mahatama Gandhi Employment Guaranty Scheme At Latur

लातूरमध्ये मग्रारोहयोच्या कामात भ्रष्टाचार; चौकशीसाठी उपविभागीय अधिकार्‍यांची समिती

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर- महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत रेणापूर तालुक्यात राबवण्यात आलेल्या विविध कामांत 5 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा अंदाज असून, मोठा निधी खर्चून 25 टक्केही काम झाले नसल्याने यातील पितळ उघडे पडले आहे. जिल्हाधिकार्‍यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून वास्तव शोधण्यासाठी उपविभागीय अधिकारी बप्पासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली चौकशी समिती नेमण्यात आली आहे.
तालुक्यातील रेणापूर, रामवाडी, गरसोळी, दवणगाव व अन्य 2 अशा 6 गावांत मग्रारोहयोअंतर्गत सप्टेंबर 2012 पासून फेब्रुवारी 2013 पर्यंत रस्ते, विहिरी, सिंचन, शतकोटी वृक्षलागवड आदी कामांवर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र खर्चाच्या 25 टक्केही काम झाले नाही. यामुळे तेथील नागरिकांत या प्रकाराविषयी प्रचंड असंतोष होता. ऑनलाइन मस्टरवर दाखवलेल्या व रजिस्टरमध्ये नोंद करण्यात आलेल्या मजुरांची नावे वेगवेगळी दाखवण्यात आली आहेत. शिवाय हिशेबाच्या रजिस्टरमध्ये पानोपानी खाडाखोड करण्यात आली आहे. हा प्रकार पाहता यात अनेक अधिकारी व कर्मचार्‍यांचे हात असल्याचे संकेत मिळत आहेत. कामांवर मोठा खर्च करूनही निधी कमी पडल्याचे दाखवत अतिरिक्त निधीची मागणी करण्यात आली होती.
त्या वेळी या प्रकरणातील बिंग फुटले. या कालावधीत श्याम पटवारी हे रेणापूरचे गटविकास अधिकारी होते. हा भ्रष्टाचार अधिकार्‍यांनी स्वत: केला आहे की
त्याला राजकीय पाठबळ आहे, अशी चर्चा सुरू आहे.