आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जलयुक्त शिवार याेजनेत 10 काेटींची बाेगस कामे, परळीत 4 कृषी अधिकारी निलंबित

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंबाजोगाई - ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या परळी मतदारसंघात जलयुक्त शिवार योजनेतील १० कोटींची कामे बोगस करण्यात आल्याची तक्रार शेतकऱ्यांनी  थेट कृषी आयुक्तांकडे केली होती. आयुक्तांनी चौकशी समिती नेमून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. अहवालानंतर विभागीय कृषी सहसंचालकांनी परळीचे कृषी पर्यवेक्षक डी.बी. सांगवे, कृषी सहायक बी.जी. केंद्रे, पी.एस. विजापुरे, एम.पी. शिर्के या चार कर्मचाऱ्यांवर १४ जूनपासून निलंबनाची कारवाई केली. इतर दोन अधिकाऱ्यांवरही निलंबनाची टांगती तलवार आहे.
 
ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या मतदारसंघात कृषी अधिकाऱ्यांच्या संगनमताने कशा प्रकारे जलयुक्त शिवार याेजनेची कामे बोगस करण्यात आली, याचे वृत्त ‘दिव्य मराठी’ने १ जून २०१७ च्या अंकात प्रकाशित केले हाेते.
शेतकऱ्यांच्या तक्रारीची दखल घेत कृषी आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी तातडीने जिल्हास्तरीय चौकशी पथक नियुक्त करत सदरील कामांची पाहणी तातडीने करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. पथकातील कृषी अधिकाऱ्यांनी कामांची प्रत्यक्ष पाहणी करून विभागीय कृषी सहसंचालक रमेश भताने यांच्याकडे अहवाल पाठवला. त्यानुसारजलयुक्तच्या कामात अनियमितता, निविदेप्रमाणे काम झाल्याचे निदर्शनास आले.
 
दोघांवर टांगती तलवार : उपविभागीयकृषी अधिकारी शिवाजी हजारी, तालुका कृषी अधिकारी एस. एस. आवाड यांच्यावर सध्या निलंबनाची टांगती तलवार आहे. उपविभागीय कृषी अधिकारी एम. एल. पाळवदे हे ३१ मे रोजी सेवानिवृत्त झाल्यामुळे त्यांच्यावर काय कारवाई होते याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
 
जिल्ह्यात १५, परळीत १० कोटींची बोगस कामे
बीड जिल्ह्यात १५ कोटी, तर परळी मतदारसंघात दहा कोटींची बोगस कामे झाली होती. हाळंब, हेळंब, खो. सावरगाव व धर्मापुरी या गावांत मातीनाला बांध, खोल समतल चर, कंपार्टमेंट बंडिंगची कामे बोगस असल्याची तक्रार शेतकरी माधव मुंडे, देवनाथ दहिफळे, मंचक गुट्टे, संदिपान गित्ते, केशव गुट्टे, बालासाहेब दहिफळे, सुधाकर दहिफळे यांनी कृषी आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याकडे केली होती.
बातम्या आणखी आहेत...