आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापरभणी- शेतीचा फेरफार करून सातबाराची नकल देण्यासाठी सहा हजार रुपयांची लाच स्वीकारणा-या पाथरी महसूल सज्जाचा तलाठी उज्वल दिलीप तंवर यास सोमवारी (दि.10) सायंकाळी चारच्या सुमारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.
याप्रकरणी तलाठी तंवर याच्यासह त्याचा मदतनीस रमेश शिवदास मठपती याच्यावरही पाथरी पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. पाथरी शहरातील सुदर्शन हरिकिशन पितळे यांचे देवनांद्रा शिवारात गट क्रमांक 233 व 259 मध्ये शेत आहे. या शेतीचा त्यांना फेरफार करायचा होता. तलाठी उज्ज्वल तंवर याने फेरफार करून सातबाराची नकल देण्यासाठी सात हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.