आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गेवराई तालुक्यात मनजीत जिनिंगला भीषण आग; कोटयवधींचा कापूस जळून खाक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेवराई- तालुक्यातील बागपिंपळगाव येथील मनजीत जिनिंगला आज (मंगळवार) सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. आगीत कोट्यवधींचा कापूस जळून खाक झाला.

 

आग विझविण्यासाठी गेवराई येथील नगर परिषद व कृषि उत्पन्न बाजार समिती असे दोन ,तर अंबड, जालना, बीड, माजलगाव नगर परिषदेचे असे सहा अग्निशामक दलाच्या गाड्या घडनास्थळी पोहोचले आहेत. आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाचे जवान युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे.

 

या भीषण आगीत 4 हजार क्विंटल कापसाच्या गाठी जळून खाक झाल्या आहेत. सुमारे 20 कोटी रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा... मनजीत जिनिंगला लागलेल्या आगीची भीषणता दर्शवणारे फोटो..

बातम्या आणखी आहेत...