आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठिबकावर कपाशीची लागवड; 14 गावांना मिळणार खते, बियाणे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिल्लोड- सिल्लोड तालुक्यात ठिबकवर आधारित कपाशीच्या लागवडीला सुरुवात करण्यात झाली आहे. पायलट योजनेअंतर्गत चौदा गावांमधील शेतकर्‍यांना शंभर टक्के अनुदानावर खत व बियाणे मिळणार आहेत. एरवी गावात, तालुक्याच्या ठिकाणी विविध कामांसाठी येणार्‍या शेतकर्‍यांची गर्दी कमी झाली आहे.
वर्षभरापासून तालुक्यातील नागरिकांसाठी पाऊस हा चिंतेचा व उत्सुकतेचा विषय झालेला आहे. गेल्या वर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले. उत्पादनात घट झाल्याने आर्थिक फटका बसलेला आहे. पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊन मार्च 2012 मध्ये सुरू करण्यात आलेल्या काही गावांमध्ये अद्याप टॅँकर सुरूच आहेत. त्यामुळे पावसाचा विषय अतिसंवेदनशील झाला होता. तीन दिवसांपासून तालुक्यातील विविध भागात रोहिण्या बरसण्यास सुरुवात झाल्याने वातावरणात बदल झाला. शेतकर्‍यांसाठी आशावादी वातावरण निर्माण झाल्याने त्यांनी आपला मोर्चा शेतातील कामाकडे वळवला आहे. एक लाख दहा हजार हेक्टर पेरणी योग्य क्षेत्र असलेल्या तालुक्यात कापूस व मका ही दोन प्रमुख पिके आहेत. नव्वद हजार हेक्टरवर या पिकांची लागवड केली जाते. अजिंठा, शिवना, अंभई डोंगरपट्ट्यात कायम धूळ पेरणी करण्याची पद्धत आहे; परंतु गेल्या वर्षी पावसाने दगा दिल्याने
मोठ्या प्रमाणात धूळ पेरणी करण्यात आली नव्हती.