आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यायालयाचा आदेश: 39 जणांवर गुन्हे दाखल, बनावट साेने गहाण ठेवल्याचे प्रकरण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना - बनावट सोने गहाण ठेवल्याप्रकरणी जेपीसी बँकेचे माजी अध्यक्ष व संचालकांसह ३९ प्रतिष्ठित व्यापाऱ्यांविरुद्ध सीआरपी १५६ ब कलमानुसार बदनापूर न्यायालयाच्या आदेशाने पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे बँकेचे संचालक मंडळ तसेच कर्मचाऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.   
 
२०१० ते २०१५ या कालावधीत विविध लोकांच्या नावाने जेपीसी बँकेत बनावट सोने गहाण ठेवून दीड कोटी रुपयांचे कर्ज बँकेने वाटप केले होते. याप्रकरणी जानेवारी २०१६ मध्ये बँकेच्या फिर्यादीवरून २७ लोकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला असून त्या गुन्ह्यातदेखील व्यवहाराचा समावेश असून तो गोल्ड व्हॅल्यूवर गौरव मंत्री एक वर्षापासून फरार असताना पोलिस शोध घेऊ शकलेले नाहीत हे विशेष. आता न्यायालयाच्या आदेशाने बँकेच्या संचालक आणि कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने पोलिसांसमोर एक प्रकारे आव्हान आहे.   
जालना पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेच्या बदनापूर शाखेतील बनावट सोने गहाण ठेवून पावणेदोन कोटी रुपयांचा गंडा घातल्याचे प्रकरण वर्षभरापूर्वीच उघडकीस आले होते. या प्रकाराकडे बँकेच्या संचालक मंडळाने दुर्लक्ष केले. वेगवान हालचाली न करता बँकेला गंडा घालणाऱ्या ठकसेनासोबत केवळ चर्चा करण्यात वेळ घालवला. या प्रकरणाचे सर्व पुरावे आता पोलिस तपासात उघड झाले. त्यामुळे या प्रकरणाशी संबंध असलेल्या काही मंडळींचे धाबे दणाणले आहेत. 
 
यातील विनायक अनिल विसपुते यांचे जालना आणि बदनापूर येथे सोने-चांदीच्या व्यवसायासह इतर जोडधंदे आहेत. विसपुते पाच जून २०१० पासून जालना पीपल्स बँकेच्या बदनापूर शाखेचा गोल्ड व्हॅल्युअर म्हणून काम करतात.बदनापूर येथील गौरव राजकुमार मंत्री यांचेदेखील सोने-चांदीचे बदनापुरात दुकान आणि खासगी धंदे होते. ते १२ मार्च २०१२ पासून बँकेचे गोल्ड व्हॅल्युअर झाले. मंत्रीने स्वतःच्या नावावर आठ कर्ज प्रकरणांत १५ लाख रुपये, वडील राजकुमार मंत्री यांच्या नावाने ३.५० लाख रुपये, भाऊ प्रीतेश मंत्री यांच्या नावाने नऊ कर्ज प्रकरणांत १९ लाख रुपये उचलले अाहेत. 

असा झाला प्रकार उघड 
दोन वर्षांपासून त्यांना बँकेच्या वसुलीच्या नोटिसा येऊ लागल्यावर ही सगळी भानगड हळूहळू सगळ्यांना समजू लागली. काही काळजी करू नका, आम्ही सगळे सांभाळून घेतो, असे म्हणत विसपुते आणि मंत्री यांच्यासह बँकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी वर्षानुवर्ष सगळे बेकायदेशीर व्यवहार झाकून ठेवले होते. या प्रकरणाचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक पंढरीनाथ बोलकर हे करत आहेत.    
बातम्या आणखी आहेत...