आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्कांसाठी शिक्षकाला मारहाणीचे ‘प्रॅक्टिकल’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर - दहावीच्या प्रात्यक्षिक (प्रॅक्टिकल) परीक्षेत माझ्या मुलाला पैकीच्या पैकी मार्क द्या या पालकाच्या मागणीला शिक्षकाने नकार दिल्यानंतर शिक्षकाला पालकाने मारहाण करून जबर जखमी केले. चाकूर तालुक्यातल्या सुगाव येथे सोमवारी हा प्रकार घडला.

सुगाव येथील संत नाना माउली विद्यालयात या परीक्षा सुरू आहेत. त्या शाळेत गावातीलच माधव गाडे याचा मुलगा दहावीच्या वर्गात शिकतो. शाळेतील काही जणांना प्रात्यक्षिक परीक्षेत पैकीच्या पैकी गुण देण्यात येणार असून त्यामुळे दहावीची टक्केवारी वाढेल, अशी गावात चर्चा होती. गाडेनेही संत नाना माउली शाळेत प्रवेश केला. त्याने तेथील शिक्षक भास्कर गायकवाड यांच्याकडे मुलाला पैकीच्या पैकी मार्क देण्याची विनंती केली. त्यावर योग्य तेच गुण दिले जातील, असे शिक्षक गायकवाड यांनी सांगितले. दरम्यान, गाडे यांनी शिक्षक गायकवाड यांना जबर मारहाण केली.