आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैजापूर, लासूर जिल्हा बँकेच्या चोरीची एकच मोडस ऑपरेंडी !

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गंगापूर तालुक्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या लासूर स्टेशन शाखेची इमारत. 		  छाया : दिव्य मराठी - Divya Marathi
गंगापूर तालुक्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या लासूर स्टेशन शाखेची इमारत. छाया : दिव्य मराठी
लासूर स्टेशन - काही दिवसांपूर्वी जिल्हा बँकेच्या वैजापूर शाखेत ज्या पद्धतीने चोरी झाली अगदी त्याच पद्धतीने चोरट्यांनी लासूरची शाखा फोडली. दोन्हा ठिकाणच्या चोरी करण्याच्या पद्धतीत (मोडस ऑपरेंडी) सारखेपणा असल्याचे खुद्द बँकेच्या संचालकांचेच म्हणणे आहे. विशेष म्हणजे शिल्लेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत आठवड्यातील चोरीची ही चौथी मोठी घटना आहे. यामुळे शिल्लेगाव पोलिसांसमोर मोठे अाव्हान उभे राहिले आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या लासूर स्टेशन शाखेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. बँकेला रात्रपाळीला सुरक्षारक्षकच नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे बँकेला सुरक्षेची किती चिंता आहे, हे यावरून दिसून येते. विशेष म्हणजे अलार्मची व्यवस्थाही नाही. सीसीटीव्ही कॅमेरेही बसवण्यात आलेले नाही. इमारतीचे दरवाजे, खिडक्या मजबूत नाहीत. या सर्व प्रकारामुळे जिल्हा बँकेचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच गंगापूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी शरद बरडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक कांचन कुमार चाटे, शिल्लेगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर, फौजदार भावसिंग राठोड, दादाराव पवार, अप्पासाहेब काळेसह पोलिस कर्मचारी व स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळी श्वानपथकालादेखील पाचारण करण्यात आले असता बाजूला असलेल्या तारकंपाउंडपर्यंत माग काढता आला. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे शाखा व्यवस्थापक सिद्धार्थ त्रिभुवन यांच्या फिर्यादीवरून शिल्लेगाव पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी भेट देत पाहणी केली. या वेळी जिल्हा परिषद सदस्य संभाजी पाटील डोणगावकर, संदेश बंब, लासूर स्टेशन येथील बाजार समितीचे संचालक दादासाहेब जगताप, महेंद्र पांडे, वकील इनामदार, ज्ञानेश्वर सोमासे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने या वेळी उपस्थित होते.
सुरक्षेची सर्व खबरदारी
घटनेची माहिती मिळताच मी लासूरच्या बँकेत पोहोचलो. मागे वैजापूर येथील शाखेत जशी चोरी झाली होती. तशाच पद्धतीने येथे खिडकीचे गज कापून चोरी झाली आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यावश्यक सर्व उपाययोजना लवकरच करण्यात येईल. प्रत्येक शाखेतील कर्मचाऱ्यांना रात्रपाळीसाठी बँकेत ड्यूटी लावण्यात येणार आहे. -नंदकुमार गांधिले, संचालक, मध्यवर्ती बँक,औरंगाबाद
पुढील स्लाइड्सवर वाचा, कशी घडली घटना...