आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाहूनगरात तरुणाचा दगडाने ठेचून खून

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड- शाहूनगर भागात सोमवारी मध्यरात्रीनंतर गजानन भगवान चंदनवार (२६) या तरुणाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला. मंगळवारी त्याचा मृतदेह आढळला.

गजानन हा रामनगरातील रहिवासी असून तो पेंटरची कामे मजुरीने करीत असे. रात्री तो घरातून बाहेर पडला. त्यानंतर तो घरी परतला नाही. सकाळी शाहूनगरात एका भिंतीच्या कडेला तरुणाचा मृतदेह आढळून आला. त्याचा चेहरा पूर्णपणे दगडाने ठेचण्यात आला. पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपींनी मृतदेह जाळण्याचाही प्रयत्न केला. त्यामुळे त्याची ओळख पटत नव्हती. विमानतळ पोलिसांनी शवविच्छेदनासाठी त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात नेले. तेथे त्याच्या कुटुंबीयांनी ओळख पटविली. प्रथमदर्शनी त्याचा खून झाला असावा, अशी शक्यता आहे.