आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोयगावात दोघांच्या मारहाणीत एक गंभीर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोयगाव- नगर पंचायत कर वसुलीच्या कारणावरून झालेल्या वादात काँग्रेस शहराध्यक्षांचा मुलगा तथा आमखेडा ग्रामपंचायतीचे सदस्य आणि भाजपचे तालुका सरचिटणीस व नगर पंचायतीच्या लिपिकात जोरदार हाणामारी झाली. ही घटना बसस्थानक परिसरातील गलवाडा रस्त्यावर सोमवारी घडली. यात लिपिकास जबर मार लागला असून त्याच्यावर जळगावच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

शिवाजी चौकात असलेल्या व्यावसायिकाला मानकर हे व्यवसाय कर भरण्यासंदर्भात सूचना देत होते. या वेळी शेजारीच असलेल्या काँग्रेसचे शहराध्यक्ष नारायण घनगाव यांचे कृषी सेवा केंद्र आहे. ते इतर व्यावसायिकांना दिलासा देत कर भरायचा नाही, मी तुझ्या पाठीशी आहे, असे सांगत होते.