आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनोविकृत महिलेकडून आईचा खून; मन्यारवाडीत शेतकऱ्याची आत्महत्या तर, त्या शेतकऱ्याचाही मृत्यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंगोली शहरातीलकमलानगर भागात मनोविकृत महिलेने आपल्या ६५ वर्षीय आईचा गळा आवळून खून केल्याची घटना रविवारी सकाळी १० वाजता घडली.
लीलाबाई किसन भिसे (६५) असे मृत महिलेचे नाव असून रेखा गजानन झुळझुळे (३२) असे आरोपी मुलीचे नाव आहे. नवऱ्याने सोडून दिल्याने ती आईकडेच राहत आहे. रेखा ही मनोविकृत असून रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्यांना पकडून मारत असल्याने तिची दहशत होती.

'त्या' शेतकऱ्याचा मृत्यू
पोटावर पत्र्याने वार करून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या शेतकऱ्याचा उपचारादरम्यान शनिवारी रात्री जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. गेवराई तालुक्यातील केकतपांगरी येथील शेतकरी पांडुरंग नानू आडे (३६) यांनी २९ जुलै रोजी बँकेचे कर्ज असल्याने शेतात पत्र्याने पोटात वार करून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. उपचारासाठी त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शनिवारी त्यांचा मृत्यू झाला.
मन्यारवाडीत शेतकऱ्याची आत्महत्या
शहरापासूनजवळच असलेल्या मन्यारवाडी येथील गणेश लक्ष्मण शिंदे (३२) या शेतकऱ्याने शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी अकराच्या सुमारास घडली. मन्यारवाडी येथील शेतकरी गणेश लक्ष्मण शिंदे यांनी रविवारी शेतातील लिंबाच्या झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. परंतु आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई, वडील भाऊ असा परिवार आहे. पोलिस पाटील सुधाकर शिवाजी शिंदे यांच्या माहितीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास स.पो.उपनिरीक्षक एस.बी. पवार करत आहेत.
बातम्या आणखी आहेत...