आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डाेक्यात लाकडी दांडा मारून पत्नीचा खून

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अाष्टी- आष्टी तालुक्यातील अंभोरा येथे रविवारी मध्यरात्री दांपत्याच्या भांडणादरम्यान पतीने डोक्यात लाकडी दांडा मारल्याने पत्नीचा मृत्यू झाला. साेमवारी सकाळी ही घटना पसरताच अाष्टी तालुक्यात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे घटनेनंतर पती स्वत: अंभाेरा पाेलिस ठाण्यापर्यंत येऊनही गेला हाेता.

अंभोरा येथील विश्वास मुरलीधर गायकवाड (वय २६) आणि राणी (वय २२) यांचे तीन वर्षापूर्वी लग्न झाले. त्यांना सहा महिन्यांचा एक मुलगा आहे. विश्वास व राणीमध्ये सतत काही ना काही कारणावरून भांडणे होत असत. यातूनच राणी तिच्या माहेरी दुरगाव (ता. कर्जत, जि. अहमदनगर) येथे गेली होती. परंतु विश्वासचे वडील मुरलीधर गायकवाड यांनी मुलाला समजावले. राणीची समजूत काढून १५ दिवसांपूर्वीच अंभोरा येथे तिला आणले होते. रविवारी मध्यरात्रीनंतर विश्वास आणि राणीचे पुन्हा भांडण झाले. त्यावेळी विश्वास याने घरातील मोगरी या लाकडी दांडक्याने राणीला मारहाण केली. त्यात राणी जबर जखमी झाली. हे लक्षात येताच विश्वास भानावर आला. त्याने मित्राला बोलावून राणीला पिक-अप वाहनातून अहमदनगरच्या सरकारी दवाखान्यात नेले. परंतु तेथे डाॅक्टरांनी राणी मृत असल्याचे सांगितले. दरम्यान, विश्वास पहाटे पाचच्या सुमारास अंभोरा ठाण्यात आला होता. त्यानेच या घटनेची माहिती दिली.