आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोखंड चोरीचा आरोप; लातुरात वाॅचमनचा खून

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर- लोखंड चोरीचा आळ घालून रविवारी येथील लोखंडाच्या कारखान्यातील वाॅचमनला कारखाना मालकासह अन्य तिघांनी बेदम मारहाण केली, यात तो मरण पावला. कारखाना मालक व त्याच्या साथीदाराने आपल्या मुलाचा खून केला असल्याची तक्रार वाॅचमनच्या आईने एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिली आहे. यावरून कारखान्याचा मालक व अन्य एकास सोमवारी अटक केली असून चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन आरोपी फरार आहेत. सूूर्यकांत ऐनफळे (३५) असे मृताचे नाव आहे.

साई रोडवरील अग्रवाल आयर्न अँड स्टील इंडस्ट्रीमध्ये गेल्या तीन वर्पांपासून सूर्यकांत हा वॉचमन म्हणून कामावर होता. त्याने कारखान्यातील लोखंड चोरल्याचा आरोप करीत रविवारी दुपारी कारखाना मालक राजेंद्र ऊर्फ पप्पू अग्रवाल, बालाजी भाडसिंगे व अन्य दोघांनी रविवारी दुपारी त्याला सळया व काठ्याने बेदम मारहाण केली. सूर्यकांत रोज दुपारी दोनच्या सुमारास जेवण करण्यासाठी घरी येत होता. रविवारी तो न आल्याने त्याची आई सुंदराबाई या कारखान्यात गेल्या असता मालक अग्रवाल व अन्य आरोपी सूर्यकांतला मारहाण करत होते. कारखान्यातील साहित्य चोरल्यामुळे त्याला मारहाण करत असल्याचे त्यांनी सुंदराबाई यांना सांगितले. त्याला सोडा, अशी विनवणी सुंदराबाईंनी अग्रवाल यांना केली, परंतु तो ड्यूटीवर आहे व रात्री साडेनऊ वाजेपर्यंत त्याला सोडणार नसल्याचे अग्रवाल यांनी सांगितल्यामुळे सुंदराबाई तेथून परतल्या. रात्री त्या कारखान्यावर गेल्या असता सूर्यकांत कारखान्याच्या गेटसमोर जखमी अवस्थेत आढळले. तेथून सूर्यकांतला दवाखान्यात नेत होत्या त्यावेळी आरोपींनी त्यांना दवाखान्यात नेऊ नको घरी ने, असे दरडावल्याने त्यांनी त्याला घरी नेले. पहाटे दोनला सूर्यकांतची प्रकृती बिघडल्याने सरकारी दवाखान्यात आणले डाॅक्टरांनी मृत घोषित केले.