आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंबाजोगाईमध्‍ये पाण्याच्या वादात तरूणाचा खून

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंबाजोगाई - सार्वजनिक नळावर पाणी भरण्यावरून चुलते नामदेव कसबे यांच्याशी प्रकाश व दशरथ कसबे या दोघांचे सुरू असलेले भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या नानाभाऊ वसंत कसबे या तेवीसवर्षीय तरुणाच्या पोटात चाकू खुपसून खून करण्यात आला. ही खळबळजनक घटना डोंगरपिंपळा गावात घडली.

मृताचे वडील वसंत संभाजी कसबे यांच्या तक्रारीवरून ग्रामीण ठाण्यात दोघा जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला. दशरथ कसबे यास अटक करण्यात आली असून दुसरा फरार आहे. डोंगरपिंपळा गावाला नीळकंठेश्वर तलावातून पाणी येते. सध्या थोड्या प्रमाणात का होईना तलावात पाणी असल्याने दहा दिवसांआड पाणी देण्यात येत आहे. पाणीटंचाईमुळे खून झाला असे म्हणता येणार नाही, याचे कारण पूर्ववैमनस्यही असू शकते.