आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रकचालक, मालकावर गावठी कट्ट्यातून गोळीबार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना - बंगळुरूहून दिल्लीकडे कच्चे नारळ घेऊन जाणाऱ्या ट्रकचालक व मालकावर गावठी कट्ट्यातून गोळीबार करण्यात आला. शनिवारी रात्री २ वाजेदरम्यान जालना-राजूर रोडवर मानदेऊळगावजवळ हा प्रकार घडला. यात ट्रकमालक गुरुप्रीतसिंग दिलीपसिंग व चालक संसारसिंग (दोघे रा. मकेरिया, ता. जि. होशियारपूर, पंजाब) अशी जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर औरंगाबादेतील घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ट्रकमालक गुुरुप्रीतसिंग दिलीपसिंग हे ट्रकमध्ये झोपले होते, तर संसारसिंग हा गाडी चालवत होता. दरम्यान, जालन्यापासून १२ किलोमीटर अंतरावर रोडवर खड्डे असल्यामुळे चालकाने ट्रकचा वेग कमी केला. या वेळी गुरुप्रीतसिंग हेसुद्धा झोपेतून जागे झाले होते. दरम्यान, गाडीचा वेग कमी असल्याची संधी साधून एक जण डाव्या बाजूने ट्रकला लटकला. त्याने ट्रक थांबवण्याचे सांिगतले. मात्र, चालकाने वेग वाढवत गाडी पुढे नेली. याच वेळी लटकलेल्या व्यक्तीने थेट दोघांच्या दशिेने गोळीबार केला व तो खाली उतरून पळाला. यात गुरुप्रीतसिंग यांचा गळा व खांद्याला जखम झाली, तर संसारसिंग याच्या डाव्या खांद्याला जखम झाली. दरम्यान, संसारसिंग याने राजूर पोलिस चौकीपर्यंत गाडी नेली व घडलेला प्रकार सांिगतला. पोलिसांनी तत्काळ रुग्णवािहका बोलवून दोघांना जालना येथील सामान्य रुग्णालयात दाखल केले. या िठकाणी प्रथमोपचार झाल्यानंतर त्यांना डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात दाखल केले.