आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भेंडाळ्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कुंभारपिंपळगाव - घनसावंगी तालुक्यातील भेंडाळा येथे 11 वर्षीय मुलीवर 16 वर्षीय मुलाने बलात्कार केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी 5.30 वाजता घडली. याप्रकरणी मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून ती इयत्ता पाचवीत शिकते.
ती शुक्रवारी दुपारी चार वाजता शाळेतून घरी परत आली.

त्यानंतर ती पाणी भरण्यासाठी जवळच असलेल्या पाइपलाइनवर गेली असता आरोपीने तिच्यावर सायंकाळी 5.30 वाजेदरम्यान बलात्कार केला. दरम्यान, सायंकाळी आई शेतातून घरी आल्यावर मुलीने घडलेला प्रकार सांगितला. मात्र, मुलगी लहान असल्यामुळे अपमान नको म्हणून आईने कुंभारपिंपळगाव येथे नेऊन खासगी रुग्णालयात मुलीवर उपचार केले. मुलीस अधिक त्रास होऊ लागल्यामुळे यासंदर्भात शनिवारी घनसावंगी पोलिसांत तक्रार देण्यात आली. याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी आरोपीस गेवराई तालुक्यातील रामपुरी येथून ताब्यात घेतले.