आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापरभणी - मौजे शिरपूर (ता. पालम) येथील विवाहितेस जाळून मारल्याप्रकरणी पतीसह सासू, नणंद व दिरास जन्मठेप आणि प्रत्येकी पाच हजार रुपये दंड, तर सास-यास तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा व दोन हजार रुपये दंड अशी शिक्षा गंगाखेड येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. सय्यद यांनी सोमवारी (दि. 10) सुनावली.
मौजे टाकळी कुंभकर्ण (ता.परभणी) येथील गोविंद विठ्ठल देशमुख यांची मुलगी कान्होपात्रा हिचा विवाह शिरपूर येथील सुनील बापूराव कदम याच्यासोबत 11 मे 2006 रोजी दोन लाख रुपये हुंडा देऊन झाला होता. लग्नानंतर सासरा बापूराव गणपत कदम, सासू शोभाबाई, पती सुनील, दीर संदीप, नणंद सविता हे विहीर खोदण्यासाठी माहेराहून एक लाख रुपये आणण्याची मागणी करू लागले. त्यासाठी त्यांनी तिचा शारीरिक व मानसिक छळ सुरू केला. कान्होपात्राचे वडील ही मागणी पूर्ण करू शकत नसल्याने त्यांनी तिच्या सासरच्या मंडळींची समजूत घातली, परंतु त्यानंतरही तिचा सातत्याने छळ सुरूच होता. मारहाण होत असल्याची माहिती तिने दूरध्वनीवरून आईवडिलांना दिली होती. दरम्यान, ती दिवाळीस माहेरी येऊन आठ नोव्हेंबर 2008 रोजी परत सासरी गेली. त्याच दिवशी सासरच्या मंडळींनी तिला पैसे न आणल्याने मारहाण केली. दुस-या दिवशी सकाळी त्यांनी तिच्या अंगावर रॉकेल टाकून जाळले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.